२६ जानेवारीला अपाचे, चिनूकची पहिली परेड

२६ जानेवारीला अपाचे, चिनूकची पहिली परेड

वायुदलाच्या ताफ्यात नव्याने सामाविष्ठ झालेल्या चिनूक आणि अपाचे या दोन्ही हेलिकॉप्टरची पहिली परेड २६ जानेवारी रोजी पार पडणार आहे. चिनूक हे ३५० किमी प्रतितास धावणारे हेलिकॉप्टर आहे, तर अपाचे सर्वात जास्त वेगाने उड्डाण घेणारे लढाऊ विमान आहे. वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन चिनूक विमान हे ‘विक’ रचनेत उड्डाण घेणार आहेत. तर पाच अपाचे विमान हे ‘एरोहेड’ रचनेमध्ये उड्डाण करणार आहेत.

उड्डाणात ४१ लढाऊ विमाने आणि चार हेलिकॉप्टर्सचा समावेश असणार आहे. यात १६ लढाऊ विमाने, १० मालवाहू विमाने आणि १९ हेलिकॉप्टरचा समावेश असणार आहे. ही परेड दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त एमआय १५ आणि व्ही-५ हेलिकॉप्टर ‘व्हाय’ रचनेत उड्डाण करणार आहे. चार हेलिकॉप्टर ध्रुव रचनेत उड्डाण करणार आहेत. यानंतर तीन चिनूक ‘विक’ रचनेत उड्डाण भरेल. त्यानंतर सुखोई- ३० एमकेआय नेत्र रचनेत उड्डाण करेल,अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. ग्लोबमास्टर ग्लोब रचनेत उड्डाण भरेल.

या परेडमध्ये पाच जॅग्वार, पाच मिग-२९ उड्डाण भरणार आहेत. जोधपूर एअरफोर्स स्टेशनहून ‘त्रिशूल’ रचनेत तीन सुखोई विमाने उड्डाण घेतील. सर्वात शेवटी राष्ट्रपती भवनाहून इंडिया गेटकडे सरळ उड्डाण करणार आहे. जमिनीपासून ६० ते तिनशे मीटर उंचारवर ही भरारी घेतली जाईल.

First Published on: January 14, 2020 6:00 AM
Exit mobile version