Pakistan: पाकिस्तानमध्ये ७० वर्षातील रेकॉर्ड ब्रेक महागाई; पेट्रोल, दुधाचे दर १५० रुपये पार

Pakistan: पाकिस्तानमध्ये ७० वर्षातील रेकॉर्ड ब्रेक महागाई; पेट्रोल, दुधाचे दर १५० रुपये पार

सध्या पाकिस्तानमध्ये इमरान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. यादरम्यान पाकिस्तानमधील परिस्थिती महागाईमुळे बिकट झाली आहे. इमरान खान यांनी अनेक आश्वासने दिली होती, परंतु त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही, अशी पाकिस्तानी जनता म्हणत आहे. पाकिस्तानमधील रेकॉर्ड ब्रेक महागाईने जनतेला इमरान खान विरोधात उभे केले आहे. पेट्रोल, साखर, दूधासह अनेक गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानातील ७० वर्षातील हा सर्वाधिक महागाईचा स्तर आहे. पेट्रोल १५० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर साखर १०० रुपये प्रति किलो विकत आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनता इमरान खान यांचे सरकार फक्त श्रीमंतांसाठी असल्याचे म्हणत आहे.

पाहा पाकिस्तानमधील महागाईची परिस्थिती

१० किलो पिठ – ७२० रुपये
एक लीटर दूध – १५० रुपये
एक किलो चिकन – ३४० रुपये
एक किलो साखर – १०० रुपये
एक डझन अंडी – १४१ रुपये
एक किलो टोमॅटो – ८० रुपये
एक किलो बटाटा – ५५ रुपये
एक किलो कांदा – ५२ रुपये

एबीपी न्यूजच्या माहितीनुसार, महागाईमुळे गरीब आणि मध्यमवर्गाची परिस्थिती खूप वाईट झाली आहे. पाकिस्तानमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंची किंमत दुप्पट झाली आहे. तसेच तूप, तेल, पीठ आणि चिकनची किंमत ऐतिहासिक स्तरावर पोहोचली आहे. पाकिस्तानचे फेडरल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्यानुसार (FBS) ऑक्टोबर २०१८ पासून ऑक्टोबर २०२१ पर्यंत वीजेचे दर ५७ टक्क्यांपर्यंत वाढले.

गेल्या रविवारी अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधत इमरान खान म्हणाले होते की, ‘बटाटा, टोमॅटोच्या किंमती नियंत्रित आणण्यासाठी राजकारणात ते नाहीयेत.’ त्यानंतर इमरान खान यांच्या असंवेदनशील विधानावर विरोधकांनी टीका केली आणि इमरान खान यांच्या प्रति लोकांमध्ये द्वेष आणखीन वाढला.


हेही वाचा – Pakistan Sialkot Explosion: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मोठे हल्ले, लष्करी तळावर लागली भीषण आग


 

First Published on: March 21, 2022 10:43 AM
Exit mobile version