घराची कौलं झाकण्यासाठी केला राष्ट्रध्वजाचा वापर; उत्तर प्रदेशमधील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

घराची कौलं झाकण्यासाठी केला राष्ट्रध्वजाचा वापर; उत्तर प्रदेशमधील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

प्रत्येक देशाला आणि तिथल्या नागरिकांना आपल्या राष्ट्रध्वजाचा अभिमान असतो. त्याचप्रमाणे भारताचा राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयासाठी प्राणापेक्षा प्रिय आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करणे हा गुन्हा मनाला जातो. दरम्यान उत्तर प्रदेश मधील शामली येतेच राहणाऱ्या एका व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दाम्पत्याला अटकसुद्धा करण्यात आली आहे. सतेंद्र सिंह आणि कविता देवी अशी या दोघांची नवे आहेत. (The national flag was used to cover the walls of the house; A case has been registered against a couple in Uttar Pradesh)

या दोघांनी त्यांच्या राहत्या घरावरील कौलं झाकण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केला. हे दाम्पत्य राष्ट्रध्वजाने घरावरील कौलं झाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या व्हायरल झालेल्या व्हिडिओची माहिती मिळताच कांढला पोलीस ठाण्याचे एसएचओ श्यामवीर सिंह यांनी तातडीने गुन्हा दाखल करून सतेंद्र सिंह आणि कविता देव या दाम्पत्याला अटक केली. या दोघांना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, “आम्ही केवळ थंडीपासून बचाव करण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करत होतो. यामुळे आम्हाला तुरुंगात जावे लागेल याची कल्पनाही नव्हती. राष्ट्रध्वजाचा अपमान करणे हा आमचा हेतू नव्हता”, अशी प्रतिक्रिया या दाम्पत्याने त्यांना अटक झाल्यानंतर दिली.


हे ही वाचा – माजी आमदाराच्या मुलाने मातोश्रीवर जाऊन बांधले शिवबंधन; भाजपाला धुळ्यात धक्का

First Published on: October 20, 2022 2:32 PM
Exit mobile version