नवीन कायदे म्हणजे दुसरी नोटाबंदीच – राहुल गांधी

नवीन कायदे म्हणजे दुसरी नोटाबंदीच – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) या मुद्द्यांवरुन आज पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेले नवे कायदे हे देशातील दुसरी नोटबंदी असल्याचेच त्यांनी म्हटले आहे. या नव्या कायदे म्हणजे नोटबंदी नंतरचा दुप्पट झटका असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आज १३५वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा करण्यात येत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेले एनआरसी, एनपीआर हे देशातील गरिबांवरील टॅक्सच आहे. ज्याप्रमाणे नोटाबंदी हा गरिबांवरील टॅक्स होता, त्याप्रमाणेच एनआरसी, एनआरपी हे देशातील गरिबांवरील टॅक्सच आहे. भावाभावांमध्ये भांडणं लावून देशाचे भले होऊ शकत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता

दरम्यान नव्या कायद्यांवरून केंद्रातील मोदी सरकारला टीका केल्यानंतर राहुल गांधी यांनी देशातील अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशाची परिस्थिती सध्या वाईट आहे. देशात मंदी आहे. बेरोजगारी आहे. जोपर्यंत देशातील सर्व नागरिक एकमेकांशी जोडले जाणार नाहीत. तोपर्यंत देशातील समस्या संपणार नाहीत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

First Published on: December 28, 2019 4:19 PM
Exit mobile version