काश्मिरी जनता त्यांची निर्णय घेईपर्यंत आमचा पाठिंबा

काश्मिरी जनता त्यांची निर्णय घेईपर्यंत आमचा पाठिंबा

इम्रान खानकडून युनोतील चर्चेचे स्वागत

काश्मीरचा मुद्दा युनोच्या ठरावानुसारच सोडवण्यात यावा. काश्मिरी नागरिक त्यांचा निर्णय घेईपर्यंत पाकिस्तान सर्वोतोपरी त्यांच्या पाठिशी राहिल, अशी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडली. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चेचे त्यांनी स्वागत केले.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत जम्मू काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर पुन्हा चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून स्वागत केले. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चा करणार्‍या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचे स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेला जम्मू काश्मीरचा प्रश्न सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यावर आहे. परिषदेने केलेली चर्चेमुळे परिस्थितीचे गांर्भीय दिसून येते. जम्मू काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावानुसार आणि तेथील जनतेच्या मतानुसार सोडवला जावा.

काश्मिरी जनता त्यांचा निर्णय घेईपर्यंत त्यांच्या निर्णय घेण्याच्या अधिकारासाठी पाकिस्तान मानसिक, राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा देत राहिल, असे इम्रान खान यांनी म्हटले. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार ३७० कलम रद्द केले. त्याचबरोबर जम्मू, काश्मीर आणि लडाख असे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये काश्मीरचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. गेल्या पाच महिन्यापासून काश्मीरमधील परिस्थिती वारंवार चर्चेत येत आहे.

First Published on: January 17, 2020 5:30 AM
Exit mobile version