काय सांगता? …अन् ‘Corona Vaccine’ घेताच 5 वर्षांपूर्वी आवाज गमावलेल्या व्यक्तीची बोलायला सुरुवात

काय सांगता? …अन् ‘Corona Vaccine’ घेताच 5 वर्षांपूर्वी आवाज गमावलेल्या व्यक्तीची बोलायला सुरुवात

काय सांगता? ...अन् 'Corona Vaccine' घेताच 5 वर्षांपूर्वी आवाज गमावलेल्या व्यक्तीची बोलायला सुरुवात

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सुरु असणाऱ्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, या लसीकरणाबाबतची शंका अनेक नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय लसीकरणामुळे होणाऱ्या परिणामांवरील अनेक किस्से आजपर्यंत चर्चेत आले आहेत. कोरोनाच्या लसीबद्दल शंका असताना अनेकजण लसीचा एकही डोस न घेता लसीकरणापासून पळ काढत आहेत. दरम्यान, लसीकरणामुळे सर्वांना थक्क करणारी एक गोष्ट समोर आली आहे. कोरोना लसीचा डोस घेताच 5 वर्षापूर्वी एका अपघातात आवाज गमावलेल्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली आहे. एका वर्षीपासून संपूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीचा आवाज कोरोना लसीकरणामुळे परत आल्याने सर्वचजण थक्क झाले आहेत. ही घटना झारखंडमध्ये घडली असून, सर्वांनाच अचंबित करणारी आहे.

या घटनेनंतर डॉक्टरही हैराण झाले आहेत. एका वृत्तानुसार, झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील सलगाडीह गावातील 55 वर्षीय दुलारचंद मुंडा अपघातानंतर पाच वर्षे आजाराशी झुंज देत होता. दुलारचंद मुंडा हा पाच वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. काही कालावधीनंतर हा व्यक्ती बरा झाला मात्र त्याच्या शरीराचे काही अवयवांचे काम करणेच बंद पडले होते. याशिवाय त्याने आवाजही गमावला होता.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दुलारचंद गेल्या काही वर्षांपासून अंथरूणाला खिळला होता. तो 5 वर्षानंतर झालेल्या अपघातानंतर व्याधीग्रस्त झाला.मात्र,आता कोरोनाच्या नव्या संकटापासून वाचण्यासाठी त्याला कोविशिल्ड ही लस देण्यात आली. ही लस घेतल्यानंतर त्याचा गमावलेला आवाज पुन्हा आला असून, अनेक अवयव काम करु लागले आहेत. पंचायत प्रमुख सुमित्रा देवी यांच्यासह अनेकांनी हा लसीचा परिणाम असल्याचा दावा केला आहे.


हेही वाचा – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक, Elon Musk असा नावात केला बदल


 

First Published on: January 12, 2022 11:24 AM
Exit mobile version