केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, महत्त्वाची घोषणा करणार

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, महत्त्वाची घोषणा करणार

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज (शुक्रवार,२६ फेब्रुवारी) दुपारी ४.३० वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. पाच राज्यांता आगामी निवणूकांची घोषणा या पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यात तर केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीतही विधानसभा निवडणूकीची घोषणा या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महत्त्वाची बैठक घेतली होती. तसेच दोन महिन्यांपासून पाचही राज्यात निवडणूक आयोगाची पथके दाखल आहेत. या राज्यांतील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे काही मागण्या केल्या असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

‘या’ राज्यांत होणार विधानसभा निवडणूक

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पूर्व रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाले. पश्चिम बंगालमध्ये आता तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे. विधानसभेच्या २९४ जागांवर पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होणार आहे.

तमिळनाडू : तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण २३४ जागांवर निवडणूक होणार आहे. जयललिता आणि जी करुणानिधी यांच्याशिवाय तमिळनाडूत पहिल्यांदाच विधानसभा निवडणूप पार पडणार आहे. सध्या मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात एआयएडीएमकेचं सरकार आहे.

पुद्दुचेरी : विधानभा निवडणूकीपूर्वीच भाजपने पुद्दुचेरीमधले काँग्रेसचे सरकार पाडले आहे. पुद्दुचेरीत विधासनभेत एकूण ३० जागांवर निवडणूक होणार आहे.

आसाम : आसाम विधानसभेमध्ये एकूण १२६ जागांवर निवडणूक होणार आहे. सध्या सर्बानंद सोनेवाल यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आहे. तसेच काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट, सीपीआय, सीपीआयएम आणि सीपीआयएमएल आणि आंचलिक गण मोर्चा यांच्यासोबत आघाडी करणार आहे.

केरळ : केरळ विधानसभेमध्ये एकण १४० जागांवर निवडणूक होणार आहे. सध्या केरळमध्ये सीपीआई(एम) पक्षाची सत्ता आहे. केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट सरकार आहे. तर पिनराई विजयन हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

First Published on: February 26, 2021 1:11 PM
Exit mobile version