सीएएला समर्थन देणाऱ्या मुलांना उत्तर प्रदेश पोलिसांची मारहाण?

सीएएला समर्थन देणाऱ्या मुलांना उत्तर प्रदेश पोलिसांची मारहाण?

CAA, NRC च्या विरोधासाठी मुंबईतील आझाद मैदानात विद्यार्थ्यांचे आंदोलन

देशभरात सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. यामध्ये मोठ्यांप्रमाणेच मुलं देखील सहभागी होत आहेत. मात्र, पोलिसांकडून ज्या पद्धतीन मोठ्यांवर कारवाई केली जाते, त्याच पद्धतीने या मुलांवर देखील केली जात असल्याचा दावा द क्विल फाऊंडेशनने केलेल्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. यामुळे खळबळ माजली असून उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली जात आहे. द क्विंटने या अहवालाच्या हवाल्याने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ताब्यात घेतलेल्या मुलांना पोलीस चौकीत नेऊन त्यांना त्रास दिला जात असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

झोपलात की फटके

अहवालात नमूद केल्याप्रमाणे, ताब्यात असलेल्या या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये झोपण्याची परवानगी नाही. झोपले की त्या मुलांना काठीने फटके मारण्यात येतात. तसेच, त्यांना भरमसाठ पाणी प्यायला दिलं जातं. मात्र, त्यांना लघवीसाठी पाठवलं जात नाही. तसेच, या मुलांशी अपमानास्पद भाषेत बोललं जातं, त्यांना जय श्री राम म्हणायला भाग पाडलं जातं, असं देखील या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या मुलांना गाडीमध्ये भरून नेताना त्यांना हाल करण्यात आलेल्या इतर आंदोलकांचे व्हिडिओ दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न देखील केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

अहवालामुळे खळबळ

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. देशभरात विविध ठिकाणी आंदोलक विरोध करण्यासाठी आंदोलन करत असून त्याला उत्तर म्हणून सीएएच्या समर्थनार्थ देखील रॅली काढण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आलेल्या या अहवालामुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली आहे.


हेही वाचा – मध्य प्रदेश सरकारने सीएए विरोधातील ठराव केला मंजूर
First Published on: February 10, 2020 9:13 PM
Exit mobile version