Coronavirus vaccination: कोरोना लस घेतल्यानंतर हात का दुखतो? जाणून घ्या कारण

Coronavirus vaccination: कोरोना लस घेतल्यानंतर हात का दुखतो? जाणून घ्या कारण

लसीकरण

देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहवा यासाठी देशभर कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र कोरोना लस घेतल्यानंतर व्यक्ती आजारी पडते, असा गैरसमज देखील पसरवला जाताना बघायला मिळतोय. मात्र कोरोना लस घेतल्यानंतर ज्या हातावर लस घेतली त्या हाताला का वेदना होतात? जाणून घ्या याचे खरे कारण…. ही लस घेतल्यानंतर होणाऱ्या त्रासाला ‘कोविड आर्म’ देखील म्हणतात.

लस घेतलेल्या जागी का होतात वेदना?

कोरोना लस घेतल्यानंतर तिचे दुष्परिणाम शरीरात बर्‍याच प्रकारे दिसून येतात. या सर्व दुष्परिणामांमध्ये, जवळजवळ प्रत्येकाच्या हाताला वेदना होते. ही वेदना इतकी जास्त असते की हात अगदी थोडासा जरी वर केला तरी लस घेतलेल्या जागी वेदना होतात. हे जरी कोविड आर्मशी संबंधित सर्व दुष्परिणाम असले तरी ते तात्पुरते स्वरूपात असतात. परंतु तरीही ते आपल्या दिनचर्येवर काही दिवस प्रभाव टाकू शकतात. हाताला होणारी वेदना आणि सूज हे सूचित करते की आपले शरीर या लसीला कसे प्रतिसाद देते.

जेव्हा ही लस दिली जाते तेव्हा शरीर हाताला झालेल्या एखाद्या दुखापती सारखा प्रतिसाद देत असते. ही लस घेतल्यानंतर ज्याप्रमाणे कापले जाते किंवा रक्तस्त्राव होतो, तशा प्रकारच्या वेदना हाताला होतात. लस घेतलेल्या जागी असणाऱ्या रक्तवाहिन्यांना आराम मिळावा यासाठी रोगप्रतिकारक पेशी निर्माण होते. या प्रक्रियेत, रोगप्रतिकारक पेशी जळजळ देखील निर्माण करतात जी शरीरास सूक्ष्मजंतूपासून संरक्षण करण्यास मदत करते. विशेषज्ञ या लसीच्या प्रतिक्रियेला ‘रिएक्टोजेनसिटी’ देखील म्हणतात. व्हॅक्सीन लिक्विडमुळे काही काळ स्नायूंमध्ये जळजळ देखील होते. कोविड आर्मचा अनुभव विशेषत: एमआरएनए लस घेणा-यांनी अनुभवला आहे. या लस घेतल्यानंतर हाताला खाज सुटणे आणि सूज येणे सामान्य असल्याचे सांगितले जात आहे.

बहुतेकांना लस घेतल्यानंतर २ ते ३ दिवस त्रास जाणवतो. परंतु, जर तुम्हाला जास्त इंफ्लेमेशन म्हणजे दाह होत असेल तर तुमच्या हाताची वेदना आणि सूज ५ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. जर आठवड्याने देखील तुमच्या हाताची वेदना कमी होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. इंफ्लेमेशनमुळे काही दिवस शरीरात अॅलर्जी, जळजळ, सूज येणे, खाज सुटणे, सांधेदुखी आणि सर्दीसारख्या समस्या जाणवतात. हे रोगप्रतिकारक प्रणालीवर होणाऱ्या परिणामामुळे होते. कधीकधी इंफ्लेमेशनचा प्रभाव बराच काळ टिकतो जर तुमच्या शरीरात आधीपासूनच इंफ्लेमेशन (दाह) असेल तर लस घेतल्यानंतर तुम्हाला सूज आणि हात दुखण्याची समस्या जाणवू शकते आणि काही लोकांच्या हाताला इतरांपेक्षा जास्त वेदना होण्याचे हेत कारण सांगितले जाते.


India Corona Update: गेल्या २४ तासात ४३,३९३ नवे रुग्ण; ४० लाख २३ हजारांहून अधिकांचे लसीकरण

 

 

 

First Published on: July 9, 2021 2:32 PM
Exit mobile version