पृथ्वीचा परिवलनाचा वेग वाढला; जीवसृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता

पृथ्वीचा परिवलनाचा वेग वाढला; जीवसृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता

पृथ्वी आपल्या अक्षाभोवती २४ तासांत एक परिक्रमा पूर्ण करते. मात्र नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार पृथ्वीने हे अंतर २४ तासांच्या आत पुर्ण केले आहे. मागील महिन्यातील २९ जुलै रोजी पृथ्वीने आपल्या अक्षाभोवती १.९ मिलिसेकंदांपूर्वीच एक प्रदक्षिणा पूर्ण केली. मागील ५० वर्षांत पहिल्यांदा असं घडलं असून यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (the speed of the earths rotation has increased)

पृथ्वीने कमी केलेले अंतर कमी वाटत असले, तरी तांत्रिकदृष्ट्या हे अंतर २४ तासांपेक्षाही कमी आहे. मात्र, पृथ्वीने प्रदक्षिणा पूर्ण केलेला हा आकाडा वाचून अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनूसार, पृथ्वीच्या परिक्रमेचा वेग हा अलीकडे वाढतो आहे. परंतु, अद्याप या गोष्टीचे ठोस कारण शास्त्रज्ञांना समजलेले नाही.

२९ जुलैच्या आधी मंगळवार २६ जुलै रोजी या दिवसाची सर्वांत लहान दिवस म्हणून नोंद करण्यात आली होती, परंतु आता २९ जुलै हा सर्वांत लहान दिवस असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, परंतु पृथ्वीच्या प्रदक्षिणेचा वेग वाढल्याचे हे परिणाम असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.

दरम्यान, पृथ्वीचा वेग असाच वाढत राहिला तर हे जीवसृष्टीसाठी अत्यंत धोक्याचे ठरू शकते. शिवाय, त्याच्या परिणामामुळे पृथ्वीवरील संपर्क व्यवस्थेत मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. यासंदर्भातील अधिक माहितीनुसार, प्रत्येक शतकात एक परिक्रमा पुर्ण करण्यासाठी ग्रह हे काही मिलिसेकंदांपेक्षा जास्त वेळ घेत आहेत.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हवामानातील बदल आणि सागरी लाटांच्या वेगाने बदलणाऱ्या हालचाली आणि पृथ्वीच्या गाभ्यातील बदल या गोष्टी पृथ्वीच्या परिक्रमेच्या वेगात वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे समजते. परंतु, शास्त्रज्ञांना या बदलाशी संबंधित कारण समजलेले नाही. पृथ्वीच्या परिक्रमेने वेग वाढवला तर एक सेकंद पूर्ण होण्यासाठी १ शतक लागेल. अशा परिस्थितीत याचा परिणाम म्हणून आपल्या वेळत १ लीप सेकंद जोडले जाऊ शकते. पण असे केल्याने आपल्या अडचणी अजून वाढतील. विशेषतः जगातील माहिती आणि तंत्रज्ञानात या मोठा फटाका बसू शकेल कारण सगळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोजमाप त्यानूसार करावे लागतील.

संगणकावरील वेळ २३:५९:५९ पर्यंत जाऊन मग ६० व्या सेकंदाला ती ००:००:०० होते. जर हीच वेळ एका सेकंदाने बदलल्यास संगणक प्रोग्राम क्रॅश होऊ शकतो असेही समजते आहे.


हेही वाचा – गोवा रेस्टॉरंट बारप्रकरणी स्मृती इराणींच्या मुलीला हायकोर्टाकडून क्लीनचिट

First Published on: August 1, 2022 8:23 PM
Exit mobile version