घरदेश-विदेशगोवा रेस्टॉरंट बारप्रकरणी स्मृती इराणींच्या मुलीला हायकोर्टाकडून क्लीनचिट

गोवा रेस्टॉरंट बारप्रकरणी स्मृती इराणींच्या मुलीला हायकोर्टाकडून क्लीनचिट

Subscribe

गोवा रेस्टॉरंट आणि बार वाद प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला हायकोर्टाने क्लीनचीट दिली आहे. यावर हायकोर्टाने म्हटले की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी या रेस्टॉरंटच्या मालक नाहीत. तसेच त्यांनी कोणत्याही रेस्टॉरंटसंबंधीत कोणत्या परवान्यासाठी अर्ज केला नाही. दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी ही टिप्पणी केली आहे.  त्यामुळे स्मृती इराणींना या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिल्ली हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी पार पडली. ज्याचे तपशीलवर आदेश आता समोर येत आहे.

दरम्यान हायकोर्टाने या प्रकरणी काँग्रेसचे नेते रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स पाठवला आहे. स्मृती इराणी यांच्याकडून दाखल मानहानीच्या दाव्यावर हा समन्स पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी इराणी यांनी या काँग्रेसच्या नेत्यांना 2 कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीशी संबंधित ट्विट तात्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले होते

- Advertisement -

रेस्टॉरंट किंवा जमीन स्मृती इराणींच्या मालकीची नाही, हायकोर्टाची टिपण्णी 

न्यायालयाने पुढे म्हटले की, बचाव पक्षाच्या ( काँग्रेसचे तीन नेते) लोकांनी आणि इतर काही लोकांनी खोट्या गोष्टी सांगितल्या. यासोबतच त्यांनी स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर वैयक्तिक हल्ले केले. असे करून स्मृती यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, वस्तूस्थिती जाणून न घेता मोठे आरोप केले गेले, ज्यामुळे स्मृती इराणी आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा खराब झाली.

स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स बजावले असून पुढील सुनावणीत उत्तरासह हजर राहण्यास सांगितले आहे. दिवाणी खटला असल्याने मानहानीचे समन्सही बजावण्यात आले आहेत. आता पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे.

- Advertisement -

हे प्रकरण गोव्यातील सिली सॉल्स कॅफे आणि बारशी संबंधित आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आरोप केला होता की, स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात रेस्टॉरंट चालवत 13 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट परवाना घेतला होता.


हेही वाचा : भारत-पाक सागरी सीमेवर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; गुजरात पोलिसांकडून 667 माफियांना अटक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -