जीडीपीचे आकडे जाहीर होण्याआधीच शेअर बाजार कोसळला

जीडीपीचे आकडे जाहीर होण्याआधीच शेअर बाजार कोसळला

प्रातिनिधीक फोटो

देशाच्या पहिल्या तिमाहीचा चालू आर्थिक वर्षातील आर्थिक वाढीचा दर आज जाहीर करण्यात येणार आहे. याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने उसळी घेतली, मात्र जीडीपीचे आकडे जाहीर होण्याआधीच दिवसभरातील व्यापारात मोठी घसरण दिसून आली. जीडीपीचे आकडे जाहीर होण्याआधीच सोमवारी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी सेन्सेक्स २.११ टक्क्यांनी म्हणजे ८३४.२२ अंकांनी घसरून ३८,६२८.२९ वर आला आणि निफ्टी २.१४ टक्क्यांनी म्हणजे २४८.८० अंकांनी कमी होऊन ११,३९८.०९ वर आली.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार तेजीत होता. सकाळी ९.१९ वाजता सेन्सेक्स ४८४.८८ अंकांनी वधारून 3३९,९५२.१९ वर बंद झाला आणि निफ्टी ११,७०० च्या वर होती. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ४१ शेअर्स ग्रीन मार्क आणि ९ शेअर्स लाल चिन्हांवर होते. आजच्या मोठ्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर इंफ्राटिल इंडसइंड बँक, कोटक बँक, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, यूपीएल, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय, आयओसी आणि विप्रो यांचे शेअर्स ग्रीन मार्कवर उघडले. एम अँड एम, भारती एअरटेल, सन फार्मा, ग्रासिम, हिंदुस्तान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एचडीएफसी आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स रेड मार्कवर उघडले.

जागतिक बाजारपेठेतील जास्त रोख आणि कमी व्याजदरामुळे परदेशी गुंतवणूकदार ऑगस्टमध्ये भारतीय भांडवली बाजारात निव्वळ खरेदीदार आहेत आणि त्यांनी एकूण आधारावर ४७,३३४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) ऑगस्टमध्ये इक्विटी विभागात आतापर्यंत ४६,६०२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, तर कर्ज विभागात ७३२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. एफपीआयने ३ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान एकूण ४७,३३४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापूर्वी एफपीआय सलग दोन महिने निव्वळ खरेदीदार होते.

 

First Published on: August 31, 2020 4:42 PM
Exit mobile version