चीनला आवरण्यासाठी आता अमेरिका सैन्य पाठवणार!

चीनला आवरण्यासाठी आता अमेरिका सैन्य पाठवणार!

आशियातील चीनची वाढती दादागिरी रोखण्यासाठी अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने युरोपमधून आपले सैन्य कमी करुन आशियामध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात जर्मनीपासून होणार आहे. अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेल्या ५२ हजार अमेरिकन सैनिकांपैकी ९,५०० सैनिक आशियामध्ये तैनात करणार आहे. पूर्वे लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनने भारतामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केल्याने अमेरिका हे पाऊल उचलत आहे. दुसरीकडे व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपीन्सला चीनकडून धोका आहे.

चीनची आशियामध्ये दादागिरी वाढल्यामुळे युरोपमधून आम्ही सैन्य कमी करत आहोत आणि ते सैन्य आम्ही आशियामध्ये तैनात करणार आहोत, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सांगितलं. जर्मन मार्शल फंडच्या ब्रुसेल्स फोरम २०२० मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सांगितलं. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या कृतींमुळे भारत, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया आणि दक्षिण चीन समुद्राभोवती धोका निर्माण झाला आहे. आम्ही सुनिश्चित करून चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकन सैन्य योग्य ठिकाणी तैनात करु.

आमचं सैन्य चीनच्या लष्कराचा सामना करणार

“आम्ही अशा प्रकारे सैन्य तैनात करू की चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) आम्हाला सामना करता येईल. हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे आणि आम्ही त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सर्व संसाधनं उपलब्ध असल्याचं सुनिश्चित करू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार सैन्याच्या तैनातीचा आढावा घेण्यात येत असून या योजनेंतर्गत अमेरिका जर्मनीमधील जवानांची संख्या ५२ हजार वरून २५ हजार केली जाणार आहे,” असंही पॉप्मिओ यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा – जम्मू काश्मीर: त्रालमध्ये पुन्हा चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान


 

First Published on: June 26, 2020 8:35 AM
Exit mobile version