गणपतीचा डिपी ठेवल्याने महिलेला मारहाण

गणपतीचा डिपी ठेवल्याने महिलेला मारहाण

गणपतीचा डिपी ठेवल्याने महिलेला मारहाण

व्हॉट्सअॅपला प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार आपल्याला हवा तो डीपी ठेवू शकतो. त्याकरता व्हॉट्सअॅप युजर्सला कोणतेही बंदी नसते. मात्र एका महिलेने व्हॉट्सअॅपला गणपतीचे पेंटीग डीपी ठेवल्याने तिच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने २९ वर्षीय महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेचा पूर्वाश्रमीचा पती कल्पेन कृष्णकांत वेलेरा आणि पत्नी धारा वेलेराल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपतीचा डिपी ठेवल्याने का केली मारहाण?

अहमदाबादच्या अस्तोदीया भागात कल्पेन कृष्णकांत वेलेरा या इसमाचे मधू या महिलेसोबत तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यादरम्यान मधू हिने कल्पेनच्या घरात गणपतीचे पेंटींग काढण्यात आले होते. त्यावेळी मधूने त्या गणपतीच्या पेंटींचा फोटो आपल्या मोबाईलध्ये फोटो काढला होता. तो फोटो मधूने आपल्या व्हॉट्सअॅप डिपी ठेवल्याने त्या महिलेला मारहाण करण्यात आली असल्याचे मधूने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

नेमके काय घडले?

गेल्या आठ महिन्यांपूर्वी कल्पेन आणि मधू या दोघांमध्ये काही कारणास्तव घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर हे दोघही विभक्त झाले होते. त्यानंतर कल्पेनने धारा वेलेरा या महिलेसोबत दुसरा विवाह केला होता. मात्र आपला घटस्फोटा झाला असून देखील तू माझ्या घरातील गणपतीच्या पेंटींगचा डीपी का ठेवते असा सवाल करत कल्पेनने महिलेला तिच्या घरी जाऊन मारहाण केल्याची माहिती उघड झाली आहे. त्या महिलेला मारहाण करताना तिला वाचवण्यासाठी तिचा भाऊमध्ये पडल्याने त्याला देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप मधू या महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेचा पूर्वाश्रमीचा पती कल्पेन कृष्णकांत वेलेरा आणि पत्नी आदिती मधू (२९) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


वाचा – डीपीवरील फोटोवरून चक्क चोर सापडला

वाचा – धक्कादायक! व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवत असाल तर सावधान


 

First Published on: December 17, 2018 4:00 PM
Exit mobile version