दिल्ली हिंसाचार: जमावानं छेड काढताच महिलेची पहिल्या मजल्यावरुन उडी

दिल्ली हिंसाचार: जमावानं छेड काढताच महिलेची पहिल्या मजल्यावरुन उडी

जमावानं छेड काढताच महिलेची पहिल्या मजल्यावरुन उडी

राजधानी दिल्लीत सीएए कायद्यावरुन झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारात जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत. या हिंसाचारात काही घृणास्पद घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. या हिंसाचारात आपल्या दोन मुलींसह पहिल्या मजल्यावरून जीव वाचवून पळालेल्या महिलेने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे.

उत्तर-पूर्व दिल्लीतल्या अल हिंद रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४५ वर्षीय महिलेने तिच्यासोबत हिंसाचारादरम्यान घडलेली घटना सांगितली आहे. “हिंसाचार होत असताना मी घरीच होते. अचानक जाळपोळ करणारा जमाव आमच्या घरात घुसला. जमावाने माझी आणि माझ्या मुलींची छेड काढायला सुरूवात केली. त्यांनी आमचे कपडेही फाडले. त्यामुळे मी आणि मुलींनी जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या. मात्र, उड्या मारल्यानंतरही जमाव आमच्यामागे लागला होता. त्यामुळे मी एक जवळच असलेल्या दुकानदाराकडे मदत मागितली. दुकानदार अयुब अहमद यांनी आमची मदत केली. त्यांनी आम्हाला जेवायला दिले. यासह त्यांनी गरजेच्या वस्तू देखील दिल्या. तसेच त्यानंतर त्यांनी आम्हाला रुग्णालयातही दाखल केले. मी छेड काढणाऱ्यांना ओळखू शकते, कारण ते सगळे आमच्याच गल्लीत राहणारे आहेत.” हे सांगत असताना महिलेने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.


हेही वाचा – ठाण्यात बहुमजली इमारतीला भीषण आग


दिल्लीत चार दिवस सीएए कायद्यावरुन झालेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. तर, लोकांच्या मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोमवारी ईशान्य दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थक यांच्यात तुफानी दगडफेक झाली. दोन्ही गटातील जमावाने लोकांची घरे, दुकाने, वाहने तसेच सार्वजनिक मालमत्तेला लक्ष्य करत जाळपोळ केली. हिंसाचारादरम्यान जाफराबाद, यमुना विहार, बाबरपूर, खजुरी खास या भागात झालेल्या अनेक करुण कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! राज्यात सर्वाधिक बालमृत्यू मुंबईत!


 

First Published on: February 28, 2020 5:16 PM
Exit mobile version