तरुणी असल्याचा बनाव करत तरुणाने दिल्लीतील नामांकीत डॉक्टरला लावला दोन कोटींचा चुना

तरुणी असल्याचा बनाव करत तरुणाने दिल्लीतील नामांकीत डॉक्टरला लावला दोन कोटींचा चुना

ऑनलाईन कमाईचा जमवत होता फंडा; ठाण्याच्या नोकरदाराला बसला लाखोंचा गंडा

जगभरामध्ये इंटरनेटच जाळ पसरलं आहे. प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण या मुलभूत गरजामध्ये आता इंटरनेटचाही समावेश झाला आहे. एकीकडे इंटरनेटमुळे संपूर्ण जगाशी कनेक्ट होता येते तर दुसरीकडे मात्र लाखो करोडोचा चुना लावून लोकांना फसवले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणी असल्याचा बनाव करत एका नामंकित डॉक्टरला चुना लावून कोट्यवधी रुपये लुबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यवतमाळ शहरातील अरुणोदय सोसायटीत राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाला  अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 72 लाख रुपये रक्कम तसेच मौल्यवान दागिने देखील जप्त केले आहेत. यवतमाळ येथील तरुणीने दिल्लीतील एका नामांकित डॉक्टराला दोन कोटी रुपयांचा चुना लावल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे आली होत. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवध्या 24 तासात या गुन्ह्याचा उलगडा केला आणि इतकंच नही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना लुबाणारा व्यक्ती ही स्त्री नव्हे तर पुरुषच असल्याचे अघड झाले.

दिल्लीतील एका डॉक्टरशी मैत्रीपूर्ण संबध प्रस्थापित करुन काही दिवसानंतर दोघांमध्ये जवळीकता वाढू लागली. या तरुणाने संधीचा फायदा घेत डॉक्टरकडे मोबाईल, अंगठी आणि इतर दागिन्यांची मागणी केली. यानंतर तरुणाने मोठी रक्कम लुबाडण्यासाठी बहिणीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. डॉक्टर दिल्लीतून यवतमाळ येथे आले. त्यांनी हॉटेल बाहेर समर नामक व्यक्तीला तरुणीच्या सांगण्यावरुन रक्कम सोपवली. यानंतर डॉक्टर दिल्लीला रवाना झाल्यानंतर पुन्हा चार लाखांची रक्कम बँक अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यास सागितली. रक्कम खात्यामध्ये जमा होताच अचानक अकाऊंट बंद झाल्याने डॉक्टरला फसवणुकीचा संशय आला आणि त्यांनी थेट यवतमाळ पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास करत अरुणोदय सोसायटीतील धाड टाकत संदेश अनिल मानकर याला अटक केली आणि यानेच तरुणी असल्याचे भासवत डॉक्टरला फसवत असल्याचे उघडकीस आले.


हे हि वाचा – केंद्र सरकारने कॅन्सर, डायबेटिस आणि टीबीवरील औषधांसह 39 औषधांचे दर केले कमी

First Published on: September 5, 2021 11:37 AM
Exit mobile version