या आहेत देशातील २४ फेक युनिव्हर्सिटी

या आहेत देशातील २४ फेक युनिव्हर्सिटी

मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व आर्थिक नुकसान होते. ही विद्यापीठे विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करतात. विद्यार्थी व पालकांची होणारी लूट थांबण्यासाठी देशातील मान्यता नसलेल्या म्हणजेच फेक विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) जाहीर करण्यात आली आहे. मान्यता नसलेल्या देशातील तब्बल २४ विद्यापीठांची नावे यूजीसीकडून जाहीर करण्यात आली आहेत.

देशातील प्रत्येक विद्यापीठाला यूजीसीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. यूजीसी कायदा १९५६ अंतर्गत कलम २२(१) नुसार केंद्र, राज्य आणि प्रांतातील शैक्षणिक संस्थांना विद्यापीठाची मान्यता देण्यात आली आहे. तर कलम ३ नुसार डिम्ड विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यूजीसी कायद्याच्या कलम २३ अंतर्गत ‘विद्यापीठ’ ही पदवी लावणे गुन्हा ठरवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना या मान्यता नसलेल्या विद्यापीठांची माहिती व्हावी यासाठी यूजीसीकडून देशातील २४ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आठ विद्यापीठे आहेत. त्याखालोखाल दिल्लीमध्ये सात, पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये प्रत्येकी दोन आणि कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक विद्यापीठ बोगस असल्याची माहिती यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

देशातील २४ बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही यूजीसीकडून करण्यात आले.

मान्यता नसलेल्या विद्यापीठांची नावे

उत्तर प्रदेश
दिल्ली
ओडिसा
पश्चिम बंगाल
कर्नाटक
केरळ
महाराष्ट्र
पुद्दुचेरी
आंध्र प्रदेश
First Published on: October 7, 2020 5:15 PM
Exit mobile version