या घड्याळाचे काटे, फिरतात ‘उलटे’

या घड्याळाचे काटे, फिरतात ‘उलटे’

घड्याळ माणसाला वेळेचं महत्व पटवून देतं, प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची शिस्त लावतात. जगभरातील बहुतांशी लोक हे या घडाळ्याच्याच तालावर आपलं आयुष्य जगत असतात. घड्याळाचे काटे जसेजसे फिरतात तसतशी आपली दिनचर्या पुढे सरकत असते. मात्र, समजा एखाद्या घड्याळाचे काटे उलटे फिरणारे असतील तर? गुजरातमध्ये खरोखरंच असं एक घड्याळ आहे ज्याचे काटे चक्क उलटे फिरतात. गुजरात राज्यातील एका आदिवासी समाजामध्ये हे उलटे फिरणारे घड्याळ वापरण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे ही ‘अँटिक्लॉकवाईज’ घड्याळं राज्यातील गावांमध्ये किंवा आदिवासी पाड्यांपुरतीच मर्यादित नसून, शहरांमध्येही ती लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया या आगळ्या-वेगळ्या घड्याळाविषयी.

हेच ते उलटे काटे असलेले आदिवासी घड्याळ  (सौजन्य-सोशल मीडिया)

या घड्याळाच्या डाएलमध्ये आदिवासी समाजाचा नायक बिरसा मुंडा यांचे चित्र आहे. तसंच आदिवासी समाजचं स्लोगनही या घडाळ्यावर छापण्यात आलं आहे. लालसिंह गमित हे तापी जिल्ह्यातील आदिवासी कार्यकर्ते  या घड्याळाचे निर्माते आहेत. हे घड्याळ आदिवासी घड्याळ म्हणून प्रसिद्ध असून, विशेष म्हणजे गेल्या २ वर्षांत अशी १० ते १५ आदिवासी घड्याळं विकली गेली आहेत. गेल्या ४० वर्षांपासून गुजरातच्या आदिवासी समुदायामध्ये हे घड्याळ तयार केले जात आहे.   मुंडा यांच्या म्हणण्यानुसार, दिवसागणीक दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये या घड्याळाची मागणी वाढते आहे.

First Published on: July 22, 2018 6:54 PM
Exit mobile version