Corona Vaccine: आता ‘या’ बड्या कंपन्या देणार कर्मचाऱ्यांना कोरोना लस

Corona Vaccine: आता ‘या’ बड्या कंपन्या देणार कर्मचाऱ्यांना कोरोना लस

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना व्हायरसचे अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कंपन्या कोरोना लसीवर युद्धपातळी काम करत आहे. पण नव्या वर्षाच्या सुरुवातील देशात कोरोना संदर्भात दिलासादायक निर्णय सरकार घेत आहे. नवा वर्षाच्या सुरुवातीला देशात आपात्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे १६ जानेवारीपासून देशात मोठ्या पातळीवर लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार आहेत. आता याच दरम्यान काही बड्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस देणार असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक स्तरावर सरकारकडून लसीची मागणी संपल्यानंतर लस बाजारात उपलब्ध होईल. यावेळी या बड्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लस विकत घेतली असे कंपन्यांनी सांगितले आहे.

या कंपन्या खरेदी करणार कोरोना लस

स्टील उत्पादक क्षेत्रातील जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे चीफ ह्यूमन रिसोर्सचे ऑफिसर पंकज लोचन यांनी ते मोठ्या प्रमाणात लस उत्पादन करणाऱ्या कंपनीशी संपर्कात असल्याचे सांगितले. तसेच पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाल्यानंतर बाजारपेठेत लस उपलब्ध होईल तेव्हाच आमच्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. महिंद्रा ग्रुप कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी आपण कर्मचाऱ्यांसाठी लस घेऊ इच्छित असल्याचे सांगितले. तसेच आयटीसी लिमिटेडसारख्या कंपन्या देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लस विकत घेणार आहे. यामध्ये कॉर्पोरेट ह्यूमन रिसोर्स, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचा समावेश आहे.


हेही वाचा – Corona Vaccine: ‘या’ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन घेऊ नये, भारत बायोटेकचा इशारा


 

First Published on: January 19, 2021 1:22 PM
Exit mobile version