मोबाईल दरवाढीपासून ‘या’ युजर्सची सुटका

मोबाईल दरवाढीपासून ‘या’ युजर्सची सुटका

मोबाईल दरवाढीपासून 'या' युजर्सची सुटका

दूरसंचार क्षेत्रात सध्या कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांनी आपले टॅरिफ प्लॅनचे दर वाढवले आहेत. १ डिसेंबर पासून आयडियाच्या ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत असून ३ डिसेंबरपासून व्होडाफोनच्या युजर्सना देखील दरवाढीचा सामना करावा लागत आहे. तर रिलायन्स जिओची दर वाढ ही ६ डिसेंबरपासून लागू झाली आहे. त्यामुळे या दरवाढीचा परिणाम थेट प्रीपेड ग्राहकांवर होणार आहे. यामध्ये सर्वप्रथम व्होडाफोन – आयडियाने टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, एअरटेलनेही आपले टॅरिफ प्लॅन वाढवण्याचे जाहिर केले. तर जीओने आपल्या नव्या प्लॅनबाबत माहिती दिलेली नाही.

या ग्राहकांना दिलासा

टेलिकॉम कंपन्यांनी केवळ प्रीपेड प्लॅन्समध्येच दरवाढ केली आहे. त्यामुळे पोस्टपेड ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्यातरी पोस्टपेड ग्राहकांच्या टॅरिफ दरावर कोणताही परिणाम होणार नाही आहे. कारण पोस्टपेड ग्राहकांना आधीच भरमसाठ बिल येत असते. त्यामुळे त्यांना या दरवाढीतून दिलासा देण्यात आला आहे. पण, लवकरच पोस्टपेड सेवांचे दर देखील वाढण्याची शक्यता असून याबाबत टेलिकॉम कंपन्यांचा विचार असल्याचे सांगितले जात आहे.

व्होडाफोन-आयडिया दरवाढ

एअरटेलची दरवाढ

जिओ दरवाढ

First Published on: December 4, 2019 6:31 PM
Exit mobile version