९व्या मजल्यावरून पडून चोराचा मृत्यू

९व्या मजल्यावरून पडून चोराचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

दिल्लीतील एका इमारतीच्या ९ व्या मजल्यावर चोरी करत असताना चोराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चोरी दरम्यान त्याला सुरक्षा रक्षकाने बघितले म्हणून त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅस पाईपच्या सहाय्याने त्याने पळण्याचा प्रयत्न केला. गॅसच्या पाईपावरून हात घसरल्यामुळे खाली पडून त्याचा मृत्यू झाला. इंदिरापूरमधील अंबा जी रेसीडेन्सीमध्ये पहाटे ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. एक देशी पिस्तुल, मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर आणि मोबाईल फोन इत्यादी सामान या चोराकडून हस्तगत करण्यात आले आहे. धर्मेंद्र कुमार असे या चोराचे नाव असून तो पूर्व दिल्ली परिसरात राहातो. धर्मेंद्रला गुजरात राज्यातही चोरी केल्यामुळे तुरुंगाची शिक्षा झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

“मयत चोर ९ व्या मजल्यावर कसा पोहोचला या बद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही. आमच्याकडे १५ मिनिटांंना सुरक्षारक्षक बदलतात. याच रक्षकांपैकी एकाने त्याला दागिणे चोरी करताना बघितले. त्याला थांबवण्यासाठी सांगण्यात आले होते.”- इमारतीचे सेक्रेटरी, रुची सप्रा

रोख केले हस्तगत

या सोसायटीमध्ये २०० फ्लॅट्स आहेत. ए,बी,सी आणि डी अशा इमारती या सोसायटीमध्ये आहेत.या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ४५७ (घरफोडी) आणि ३८० (चोरी) कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी धर्मेंद्र जवळून ९ हजार ९०० रुपयेही हस्तगत केले आहेत.

First Published on: January 10, 2019 4:34 PM
Exit mobile version