या क्रूर दहशतवाद्याने घडवून आणला दहशतवादी हल्ला

या क्रूर दहशतवाद्याने घडवून आणला दहशतवादी हल्ला

या क्रूर दहशतवाद्याने घडवून आणला दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. हा हल्ला घडवून आणणारा अतिरेक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा आदिल अहमद दार ऊर्फ वकास या क्रुर अतिरेक्याने हा हल्ला घडवल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये उरी हल्यानंतरचा हा अतिशय मोठा हल्ला म्हटला जात आहे. या हल्ल्यांमध्ये २० जवान शहिद झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर जखमी जवानांची संख्या देखील २० च्या घरात आहे. अतिशय दुर्देवी अशी ही घटना घडली आहे. या हल्ल्याचा सुत्रधार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी आदिल अहमद दार ऊर्फ वकास याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपण हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले आहे.

कोण आहे हा क्रूर दहशतवादी?

आदिल अहमद दार हा दहशतवादी जैश-ए-मोम्मद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी आहे. आदिल हा पुलवामा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. बुरहान वानी या दहशतवाद्याला २०१६ मध्ये भारतीय सैन्याने मारले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर अनेक स्थानिक तरुण दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. आदिल दार हा देखील तेव्हाच दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

 

First Published on: February 14, 2019 6:24 PM
Exit mobile version