OTT Release This Week: OTT Platformsवर रंगणार कॉमेडी, हॉरर आणि ड्रामा सीरीजचा धमाका

OTT Release This Week: OTT Platformsवर रंगणार कॉमेडी, हॉरर आणि ड्रामा सीरीजचा धमाका

ओटीटी प्लॅटफॉर्मवर यंदाच्या आठवड्यात मनोरंजनाचा डबल धमाका पहायला मिळणार आहे. तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, हॉरर आणि ड्रामा सीरीजची मैफील रंगणार आहे. नेटफ्लिक्सवर हॉरर आणि कॉमेडी आणि ड्रामा पाहता येणार असून पवित्र रिश्ताचा सीझन झी-५ वर पाहता येणार आहे. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारवर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी नक्की काय मैफील रंगणार आहे. हे आपण जाणून घेऊयात.

कपिल शर्मा शो (Kapil Sharma: I am not done yet)

कपिल शर्मा शो डिजिटल डेब्यूच्या माध्यमातून पाहिला जाऊ शकतो. कपिल शर्माच्या यशाची गोष्ट अनेकांना प्रोस्ताहित करते. या शोमध्ये कपिल त्याचे मजेशीर आणि हटके अनुभव सांगणार आहे. त्याचा प्रोमो पाहून वाटतंय की, या शोमध्ये त्याची पत्नी गिन्नी चतरथ देखील प्रेक्षकांमध्ये दिसणार आहे.

वूमन इज द हाऊस (Woman in The House)

जर तुम्हाला सस्पेन्स आणि थ्रिलरची आवड असेल तर २८ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारी सारीज तु्म्हाला पहायला आवडेल. ही एक अशी स्टोरी आहे. ज्यामध्ये एक महिला एकाच रूममध्ये अनेक दिवसांपासून राहते. दरम्यान या सारीजमध्ये शेजारच्या घरात एकाची हत्या होते. परंतु हे रहस्य कधी उलघडणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही सारीजी पहावी लागणार आहे.

तडप (Tadap)

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २८ जानेवारी रोजी तडप हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी दिसणार आहे. आहानची बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एन्ट्री झाली आहे. रोमँण्टिक चित्रपट पहायचे असल्यास तुम्हाला हा चित्रपट नक्की पहायला आवडेल.

ऑल ऑफ अस डेड (All Of Us Are Dead)

जर हॉरर चित्रपटाचत तुम्हाला झोम्बी हा चित्रपट बघायला आवडत असेल. तर २८ जानेवारी रोजी म्हणजेच आज हा कोरियन झोम्बी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Netflix वरील ही सीरीज झोम्बी व्हायरसच्या कल्पनेवर आधारित आहे.


हेही वाचा : BJP 12 MLA’s Suspension: भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन ते सर्वोच्च न्यायालयाचा निलंबन रद्द आदेश, महत्वाच्या १२ घडामोडी


 

First Published on: January 28, 2022 2:02 PM
Exit mobile version