दहशतवादी संघटना SFJची SCच्या ३५ वकिलांना धमकी; म्हणाले, पंतप्रधान मोदींना मदत करू नका

दहशतवादी संघटना SFJची SCच्या ३५ वकिलांना धमकी; म्हणाले, पंतप्रधान मोदींना मदत करू नका

सर्वोच्च न्यायालयाच्या जवळपास ३५ वकिलांना खलिस्तान समर्थकांकडून धमकी मिळाली आहे. शीख फॉर जस्टिसकडून इंग्लंडच्या नंबरवरून आलेल्या ऑटोमॅटेड फोन कॉलच्या माध्यमातून वकिलांना धमकी देण्यात आली आहे. कॉलच्या ऑडिओ रिकॉर्डिंगतून खुलासा झाला आहे की, कॉल करणारा म्हणाला की, शेतकरी आणि पंजाबच्या शीखांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू नये. शीख दंगली आणि हत्याकांडात एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही हे तुमच्या आठवणीत राहिले पाहिजे.

अनेक वकिलांनी दावा केला आहे की, त्यांना धमकीच्या क्लिप आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय अॅडवोकेट ऑन रिकॉर्ड असोसिएशनने याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरलला शीख फॉर जस्टिसकडून आलेल्या धमकीची सूचना दिली आहे.

आज शीख फॉर जस्टिस (एसएफजे) संघटनेशीसंबंधित असलेल्या काही ट्वीट हँडलवरून २६ जानेवारीला इंडिया गेट आणि लाल किल्ल्यावर नाकाबंदी करण्याबाबत ट्वीट केले आहे. तसेच भारतीय संविधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नाकाबंदी आयोजन करण्यासाठी १० लाख डॉलरची घोषणा करत आहेत.

दरम्यान पंजाब दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र यांच्या सुरक्षेतील चुकीच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत. या समितीमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) डीजी आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) च्या पंजाब युनिटचे अतिरिक्त डीजी यांचाही समावेश असेल, असे सांगण्यात आलेय.


हेही वाचा – ओमिक्रॉननंतर आता घातक deltacron ची एन्ट्री; या देशात आढळला पहिला रुग्ण


 

First Published on: January 10, 2022 7:03 PM
Exit mobile version