Farm Laws: आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा झाला विजय – सोनिया गांधी

Farm Laws: आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा झाला विजय – सोनिया गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली. तीनही कृषी कायदे सरकार परत घेणार असून एमएसपीसंबंधित मुद्द्यांवर विचार करण्यासाठी समिती तयार करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘७०० हून अधिक शेतकरी कुटुंबांचे बलिदान, ज्यांच्या सदस्यांनी या न्यायाच्या लढाईत आपले प्राण दिले, त्यांचे बलिदानाचे चीज झाले आहे. आज आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे.’

पुढे त्या म्हणाल्या की, ‘१२ महिन्याच्या गांधीवादी आंदोलनानंतर आज देशाच्या ६२ कोटी अन्नदाता, शेतकरी, शेत मजूर यांच्या संघर्ष आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे. आज सत्तेत बसलेल्या लोकांनी केलेले शेतकरी-मजूरविरोधी षडयंत्र हरले आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकारही हरला. तसेच आज शेतीवर हल्ला करण्याचा कटही हरला. आज शेती विरोधातील तीन काळे कायदे हरले आणि अन्नदात्याच्या विजय झाला.’

केंद्र सरकारवर निशाणा साधत सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘गेल्या ७ वर्षांपासून भाजप सरकार सतत शेतीवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले. मग भाजप सरकार बनताच शेतकऱ्यांना दिले जाणारे बोनस बंद करणे असो किंवा अध्यादेश आणून शेतकऱ्यांच्या जमिनीचा न्याय्य मोबदला कायदा संपवण्याचा षडयंत्र असो. आता पुढे पंतप्रधान आणि भाजप सरकार आपला अभिमान आणि अहंकार सोडून शेतकरी हिताची धोरणे राबवण्यावर भर देईल अशी आशा आहे.’


हेही वाचा – Farm Laws : तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी-देशद्रोही म्हटलं, तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा?; प्रियांका गांधीचा मोदींना सवाल


First Published on: November 19, 2021 5:40 PM
Exit mobile version