एका दिवसात तीन लढाऊ विमानांचा भीषण अपघात, सुखोई-३०, मिराज आणि मिग जळून खाक

एका दिवसात तीन लढाऊ विमानांचा भीषण अपघात, सुखोई-३०, मिराज आणि मिग जळून खाक

एका दिवसात तीन लढाऊ विमानांचा भीषण अपघात, सुखोई-३०, मिराज आणि मिग जळून खाक

Three fighter jets crash |नवी दिल्ली – एका दिवसात हवाई दलाच्या तीन विमानांचे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. राजस्थानच्या भरतपूर येथे हवाई दलाचे मिग हे लढाऊ विमान कोसळले तर मध्य प्रदेशच्या मुरैना येथे सुखोई ३० आणि मिराज हे दोन लढाऊ विमान कोसळले आहेत. या अपघातांची चौकशी सुरू असून तिन्ही लढाई विमानांची राखरांगोळी झाली आहे.

मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील पहाडगढच्या जंगलात सुखोई-३० आणि मिराज २००० हे दोन लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही विमान कोसळले. परंतु, लढाऊ विमान कोसळल्याने भीषण आग लागली. या आगीत दोन्ही विमाने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, मिराज विमानातील एका पायलटचा मृत्यू झाला असून सुखोईतील पायलट सुरक्षित आहे.


तर, दुसरा अपघात घडला राजस्थानात. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील उच्चैन पिंगोल येथे हवाईदलाचे मिग हे लढाऊ विमान कोसळले आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लढाऊ विमान कोसळताच आग लागली. त्यामुळे याप्रकरणी लागलीच जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. येथील ग्रामीण भागात मोठा आवाज आला. आवाजाच्या दिशेने गावकरी जाताच त्यांना विमान कोसळल्याचे दिसले. त्यांनी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण हे विमान काहीच वेळात जळून राख झाले. या विमानात दोघेजण होते असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आजूबाजूच्या परिसरात कोणीही जखमी अवस्थेत सापडले नाही. त्यामुळे या विमानाच्या पायलटने अपघाताच्या आधी उडी मारली असल्याचा अंदाज आहे.


एकाच दिवशी तीन लढाऊ विमानांचा अपघात त्यांची राखरांगोळी झाल्याने हवाई दलाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अपघातांप्रकरणी हवाई दलाकडून तपास करून अधिकृत माहिती दिली जाईल.

First Published on: January 28, 2023 12:11 PM
Exit mobile version