पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा, दारुगोळा जप्त

जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना सुरक्षा बलाच्या जावानांनी ठार केले. सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये ही चकमक पुलवामा येथे झाली. अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात दोन एके 47 रायफल, एक पिस्तूल आणि मोठ्या संख्येने दारुगोळ्या जप्त करण्यात आला आहे. जवानांकडून चकमक झालेल्या भागाचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांची नावे इरफान मलिक, फजिल नजीर भट्ट, जुनैद कादिर असून ते लष्कर- ए- तोयबा अतिरेकी संघटनेचे सदस्य होते.

सर्व अतिरेकी स्थानिक  –

खात्मा करण्यात आलेले सर्व अतिरेकी स्थानिक होते. इरफानचे वय 25 होते. तो पुलवामाच्या हरिपोरा येथील होता. फाजिल नजीर भट्टचे वय 21 वर्ष असून फाजिल पलवामाचा रहीवाशी होता. तर पुलवामाच्या गुदौरच्या जुनेद कादिरचे वय 19 वर्ष होते. या तिघांचाही चकमकीत खात्मा करण्यात आला. जम्मू काश्मीर पोलिसांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

विडीओ आला होता समोर –

पंधरा दिवसापूर्वीच काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक झाली होती. यात लष्कर-ए-तोयबाच्या एका डिप्युटी कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. या अतिरेक्यांचा मरण्याआधीचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने चित्रीत केला होता. यामुळे अतिरेकी कोठे लपून बसलेत याची माहिती समोर आली होती. यानंतर अतिरेख्यांची पोझिशन आणि त्यांच्या सोबत असलेल्या हत्यारांची माहिती पोलिसांना मिळाली होती.

First Published on: June 12, 2022 8:21 AM
Exit mobile version