अनंतनागमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

अनंतनागमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरु होती. या चकमकीत अखेर हिझबुल मुझहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. कमांडर नासिर चंद्रू यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्नीरमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता. त्यांच्या कटाबाबत गुप्तहेर संस्थांना माहिती मिळाली होती. त्याच पारश्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. सीमेलगत भागात हाय अलर्ट जारी करण्यात आले होते. दरम्यान, अनंतनागमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार आज सकाळपासून त्यांनी शोध मोहिम सूर केली आणि तीन दहशतवाद्यांना त्यांनी ठार केले.

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळपासून चकमक सुरु होती. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चहुबाजूंनी घेरले होते. ही शोध मोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर खाली करण्यात आला. या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – जम्मू–काश्मीरच्या बटोटमध्ये चकमक; दहशतवाद्यांकडून बस अडवण्याच प्रयत्न

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर देशात मोठा घातपात घडवण्याचा प्रत्न दहशतवादी करत आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. सुरक्षा दलाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी सीमारेषेवर पाकिस्तानच्या लष्काराकडून वारंवार शस्त्रसंधींचे उल्लंघन केले जात आहे. दरम्यान, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला चौख प्रत्युत्तर दिले जात आहे.

First Published on: October 16, 2019 10:59 AM
Exit mobile version