चीनच्या चोंगकिंगमध्ये विमान अपघात; टेक ऑफच्या वेळी विमानाने घेतला पेट

चीनच्या चोंगकिंगमध्ये विमान अपघात; टेक ऑफच्या वेळी विमानाने घेतला पेट

चीनच्या चोंगकिंगमध्ये गुरूवारी मोठा अपघात झाला. विमानतळावर तिबेट एअरलाईन्सचं विमान टेक ऑफ दरम्यान रन वे वरून घसरलं. यानंतर क्षणार्धातच या विमानाला आग लागली. या अपघातात काही जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला असून विमानाला आग लागल्याचं यात स्पष्टपणे दिसत आहे. तसंच ही आग विझवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचं यात दिसून येत आहे.

सीसीटीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार चोंगकिंगहून ल्हासा येथे जाणाऱ्या विमानात चोंगकिंग जियांगबेई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आग लागली. या विमानात ११३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर प्रवास करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या अपघातात जखमी झालेल्या लोकांना त्वारित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

दोन महिन्यांपूर्वीही चीनमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला होता. चीनच्या ईस्टर्न एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात धाला होता. यामध्ये १३२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या विमानात एकूण १२३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर्स होते.


हेही वाचा – मुंबईतील ‘या’ भागांमध्ये १८, १९ मे रोजी पाणीपुरवठा राहणार बंद

First Published on: May 12, 2022 9:42 AM
Exit mobile version