TikTok चे CEO Kevin Mayer यांचा राजीनामा; अवघ्या १०० दिवसांत कंपनीला GoodBye!

TikTok चे CEO Kevin Mayer यांचा राजीनामा; अवघ्या १०० दिवसांत कंपनीला GoodBye!

वादग्रस्त चिनी अॅप TikTok ला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी भारतात होणारा बहिष्कार आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांदरम्यान राजीनामा दिला आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने फायनान्शियल टाईम्स या वृत्तपत्राचे हवाला देत म्हटले आहे की, जनरल मॅनेजर वनीसा पपाज (Vanessa Pappas) यांची तातडीने अंमलबजावणी करून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डिस्नेचे माजी कार्यकारी केविन मेयर जगातील सर्वात मोठ्या शॉर्ट व्हिडिओ अॅपसाठी मे महिन्यात कार्यभार सांभाळण्यास सहभागी झाले होते. परंतु, कंपनीत जॉईनिंग झाल्यानंतर त्यांनी १०० दिवसांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. ६ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक बंद करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. अमेरिकेने बाईटडन्स अ‍ॅपच्या अमेरिकेतील व्यवहार, कामांची विक्री करण्यास सांगितले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत टिकटॉकसह ५९ चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय भारताने घेतला होता. भारताच्या या निर्णयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिकेत अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्यांनी मूळ कंपनी बाईटडन्सला टिकटॉकचे अमेरिकन ऑपरेशन अमेरिकन कंपन्यांना विकण्यास भाग पाडले. अलीकडेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉकच्या भविष्या संदर्भात नवीन कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचे सांगितले जात आहे.


विराट – अनुष्काने दिली Good News! बेबी बम्पचा फोटो केला शेअर
First Published on: August 27, 2020 12:47 PM
Exit mobile version