मसूद अझहरला दहशतवादी घोषित न करण्यावर चीन ठाम

मसूद अझहरला दहशतवादी घोषित न करण्यावर चीन ठाम

जैश– ए– मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात यावी यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र पुन्हा एकदा चीन या निर्णयामध्ये आडकाठी आणत आहे. मसूदप्रकरणी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सर्व सदस्य देशांचा पाठींबा आहे. केवळ चीनच आपल्या वीटो या विशेषाधिकाराचा वापर करीत यात अडथळा आणत आहे.

पाकिस्तानात वास्तव्यात असलेला मसूद अझहर याला दहशतवादी घोषित करण्यासाठी ब्रिटन-फ्रान्सकडून चीनवर दबाव वाढवण्यात आला आहे. चीनने तांत्रिक बाबींद्वारे या प्रक्रियेत अडथळा आणू नये असं ब्रिटन-फ्रान्सने चीनला बजावले आहे. युएनएससीच् १२६७ प्रतिबंध समिती येत्या काही दिवसात परिषदेत मसूदला दहशतवादी घोषीत करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे २३ तारखेपर्यंत चीनने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं आहे. चीनने या प्रस्तावावर थेट परिषदेतच पाठींबा द्यावा यासाठी हा कालावधी देण्यात आला आहे. मात्र चीन मसुदला दहशतवादी न करण्यावर ठाम आहे.

चीनने या प्रस्तावाला थेट परिषदेतच पाठींबा दिला तर १२६७ समितीकडून मसूदच्या बंदीचा प्रस्ताव आणण्याची गरजच पडणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव अनौपचारिकरित्या १५ देशांकडे पाठवण्यात आला आहे. मसूदच्या प्रवासावर बंदी घालण्यासाठी आणि त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करणे गरजेचे आहे.

First Published on: April 12, 2019 9:35 AM
Exit mobile version