Today Gold Price: अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापर्यंत सोन्याचा दरात होणार मोठी घसरण, जाणकारांचे मत

Today Gold Price: अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापर्यंत सोन्याचा दरात होणार मोठी घसरण, जाणकारांचे मत

Gold

सोने खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सराफा दुकाने बंद असल्याने आणि रुग्णसंख्या वाढत असल्याने सोन्याचा दरात मोठी वाढत झाली आहे. दरम्यान शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याचा दर ५९ हजारांवर पोहचला होता. तर मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा प्रति १० ग्रॅम भाव ४७ हजार ६५४ रुपयांवर पोहचला आहे. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्य़ाचा बाजार ४७ हजार ७०६ रुपये प्रति १० ग्रॅमने सुरु झाला आहे.

दरम्यान कोरोनामुळे सोन्याचा मागणीत घट झाल्याने अनेक भांडवलदारांनी भीतीने सोन्यामधील गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दरात मोठी वाढ होत आहे. यात गुरुवारी सोन्याचा दर १५५ रुपयांनी वाढला असून प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार १५५ रुपये झाला आहे. तसेच मल्टी एक्सचेंजमध्ये जून महिन्याच्या डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत १५५ रुपये म्हणजे ०.३३ टक्क्यांनी वाढली असल्याने सोन्याचा प्रति १० ग्रॅम भाव ४७ हजार १५५ रुपयांवर पोहचला आहे.

जानकारांचा मते, दिल्ली- मुंबईसह अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सोन्याची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दरावर याचा परिणाम होत आहे. नागरिक सध्या कोरोनापासून कसा बचाव करता येईल याकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे २०२१ सोन्याची मागणी घटल्याने सोने पहिल्य़ांदाच डिस्काउंट रेटवर आले आहे.

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापर्यंत सोन्याचे दर घसरणार 

इंडिया इन्फोलाइन सिक्योरिटीज (IIFL Securities) वाइस प्रेसिडेंट (कमॉडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता यांचा मते, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापर्यंत सोन्याचा दरात घसरण होणार असल्याने ग्राहकांना सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सोन्याचे दर कमी होण्यामागचे कारण कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन असण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही गोष्टींमुळे देशात सोन्याचा बाजार पुर्णपणे ठप्प झाला आहे. यात येत्या काही दिवसांत सोन्याची मागणी वाढण्याची कोणताही आशा दिसत नाही. त्यामुळे आगामी काळातही सोन्याची मागणीत आणखी घट होणयाची परिस्थिती निर्माण झाली आहे.  मागणी घटल्याचा परिमाण सोन्याचा किंमतींवर होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचा दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापर्यंत सोने अजून स्वस्त होण्याची शक्यता आहे.


 

First Published on: May 7, 2021 2:36 PM
Exit mobile version