ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी

सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरुरी यांच्या खंडपीठाने भूषण यांना दोषी मानले आहे. तसेच या सुनावणी दरम्यान सांगण्यात आले की, २० ऑगस्ट रोजी न्यायालयात या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे नागपूर राजभवन येथील मोटारसायलवरील फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यावर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटच्या माध्यमातून टिप्पणी केली होती. त्याच ट्विटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती. प्रशांत भूषण यांनी सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारे देखील ट्विट केले होते. मग वकील महेश महेश्वरी यांनी हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायलयाने भूषण यांच्याकडे या दोन ट्विटबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. तसेच भूषण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा अशी देखील नोटीस सर्वोच्च न्यायालयाने बजावली होती. त्यानंतर प्रशांत भूषण यांनी नोटीशीचे उत्तर ते म्हणाले की, ‘ट्विट हे न्यायाधीशांच्या वैयक्तिक पातळीवर असून यात न्यायालयाचा अवमान करण्यात आला नव्हता.

यानंतर ५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. भूषण यांच्यासह ट्विटर कंपनीलाही सर्वोच्च न्यायलयाने मत मांडण्यास सांगितले होते. तसेच भूषण यांचे ट्विट डिलीट का केले नाही, अशी ट्विटरला विचारणा करण्यात आली होती. यावर ट्विवरटकडून न्यायालयात सांगण्यात आले की, ‘जर न्यायालयाने आदेश दिले तर ट्विट काढू टाकेल जाईल पण स्वतः ट्विटर ते ट्विट काढून टाकणार नाही.’


हेही वाचा – केंद्र परीक्षा घेण्यासाठी आग्रही; यूजीसीच्या भूमिकेला पाठबळ


 

First Published on: August 14, 2020 3:00 PM
Exit mobile version