Top 10 Billionaires : जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये गौतम अदानी तिसरे, अंबानी ‘या’ स्थानावर

Top 10 Billionaires : जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये गौतम अदानी तिसरे, अंबानी ‘या’ स्थानावर

मुकेश अंबानींना मागे टाकून ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा दबदबा कायम आहे. अदानींनी पुन्हा एकदा मोठी झेप घेत ते जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनियर्स इंडेक्समध्ये अदानी यांची एकूण संपत्ती $ 131.3 अब्ज इतकी आहे. एकूण संपत्तीच्या बाबतीत अदानींनी जेफ बेझोसलाही मागे टाकले आहे. बेझोस यांची एकूण संपत्ती 126.9 अब्ज डॉलर इतकी आहे.

एलन मस्क यांचे स्थान जैसे थेच

टेस्ला कंपनीचे मालक आणि ट्विटरने नवे मालक एलन मस्क यांचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील स्थान जैसे थेच आहे. 223.8 अब्ज डॉलर्स संपत्तीसह ते फोर्ब्सच्या यादीत पाहिल्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी फ्रान्सचे अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 156.5 अब्ज डॉलर इतकी आहे. यासोबत वॉरेन बफे 104.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. तर बिल गेट्स 102.9 अब्ज डॉलर्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. यासह लॅरी एलिसन हे 102.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत.

जगातील पहिल्या दहा अब्जाधीशांमध्ये दोन भारतीय उद्योजकांचा समावेळ आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी यांच्याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $89.2 अब्ज आहे.


2023 मध्ये होणार तिसरे महायुद्ध? बाबा वेंगाची भविष्यवाणी होणार खरी

First Published on: October 30, 2022 3:34 PM
Exit mobile version