AstraZeneca लसीकरणानंतर ‘ब्लड क्लॉट’ची समस्या, भारताकडून गंभीर दखल

AstraZeneca लसीकरणानंतर ‘ब्लड क्लॉट’ची समस्या, भारताकडून गंभीर दखल

AstraZeneca लसीकरणानंतर ब्लड क्लॉटची समस्या, भारताकडून गंभीर दखल

AstraZeneca या लस दिल्यानंतर शरीरात रक्ताचा गुठळ्या झाल्याने ब्रिटनमध्ये ७ व्यक्तींनी प्राण गमावल्याची धक्कादायक घडली. या घटनेनंतर अनेक देशांनी लसीकरणावर चिंता व्यक्त केली. आता भारत सरकारही AstraZeneca लसीकरणाबाबत अधिक गंभीर झाले आहे. यासाठी भारताने लसीकरणानंतर दिसणाऱ्या परिणामांचा  अभ्यास करण्यासाठी मुख्य समिती नेमली आहे. याआरोग्य समितीमार्फत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसी दिल्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांसंबंधीच्या देशातील आकडेवारीचा विस्तृत अभ्यास केला जाणार आहे. या माध्यमातून लसीकरणानंतर रक्ताच्या होणाऱ्या गुठळ्यांचा आणि लसीचा काय संबंध आहे याचा माहिती जाणून घेतली जाणार आहे.

यासाठी बुधवारी युरोपीयन मेडिसिन अथॉरिटी(ईएमए)च्या निर्देशांचे पालन करण्यात आले. यामध्ये AstraZeneca या लस दिल्यानंतर सामान्य स्वरुपात दिसणाऱ्या परिणामांमध्ये अबनॉर्मली लो ब्लड प्लेटलेट्ससह असामान्य रक्ताच्या गुठळ्यांना लिस्टेड करण्यात आले. या ईएमएच्या सुरक्षा समिती(पीआरएसी) निदर्शनास आले की, या रक्ताच्या गुठळ्या मेंदू, पोट, धमन्यांसह पेशींवर आढळून आल्या. यासोबतच ब्लड प्लेटलेट्स निम्म्या स्तरावर पोहचत रक्तस्त्रावही झाला होता. ब्रिटनमधील लसीकरणकर्त्यांनी नियामकाला (एमएचआरए) या लसीच्या शिफारशीत सुधारणा करण्याचे आदेश दिले. ही लस सीरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडियाने कोविशिल्ड ब्रॉन्डअंतर्गत भारतात तयार केली आहे.

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितले की, भारतीय नियमक मंडळाने भारतही अशा प्रकारे घडणाऱ्या प्रतिकूल घटनांची माहिती जाहीर केली पाहिजे. भारतात एडवर्ज इवेंट फॉलोइंग इम्यूनाइजेशन(AEFI)साठी राष्ट्रीय समिती आता प्राथमिकतेच्या आधारे जवळपास १९,५०० कमी जास्त प्रकरणात वॅक्सीनेशननंतर एडवर्स रिएक्शन रिपोर्टचा विस्तृत अभ्यास करणार आहे.


 

First Published on: April 9, 2021 12:47 PM
Exit mobile version