CoronaVirus: देशात २४ तासांत ५३,९२० जणांनी केली कोरोनावर मात

CoronaVirus: देशात २४ तासांत ५३,९२० जणांनी केली कोरोनावर मात

देशात गेल्या २४ तासांत ५० हजारांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ५७७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८४ लाख ६२ हजार ८१ वर पोहोचला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप थांबलेला नसला, तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये ५३ हजार ९२० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येतही काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशात सध्या ५ लाख १६ हजार ६३२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात ५३ हजार ९२० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासह ७८ लाख १९ हजारांहून अधिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या देखील मोठ्या प्रमाणावर घेतल्या जात आहे. देशभरात ६ नोव्हेंबरपर्यंत ११ कोटी ६५ लाख ४२ हजार ३०४ नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील ११ लाख १३ हजार २०९ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

तर शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या पाच आठवडय़ांपासून कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे नव्याने संसर्ग होणाऱ्या रूग्णांहून अधिक आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतील घटही कायम असून त्यांचे प्रमाण देशातील एकूण बाधितांच्या संख्येच्या केवळ ६.१९ टक्के इतके आहे.


Bihar Election 2020: “वोटिंग का नया रिकॉर्ड बनाएं,” पंतप्रधान मोदींनी केलं मतदारांना आवाहन

First Published on: November 7, 2020 10:33 AM
Exit mobile version