Bihar Election 2020: “वोटिंग का नया रिकॉर्ड बनाएं,” पंतप्रधान मोदींनी केलं मतदारांना आवाहन

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास ५३.५१ टक्के इतके मतदान झाले.

Andolanjeevi is a new community in India says pm narendra modi
आंदोलनजीवी नवी जमात, देशानं सावध रहावं - पंतप्रधान मोदी

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील मतदार आज एकूण १ हजार २०८ उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करत एक नवा रेकॉर्ड करण्याचं आवाहन केलं आहे. करोना संकटात बिहार विधानसभा निवडणूक पार पडत असून पहिलीच निवडणूक ठरली आहे.

मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, “बिहार तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान करत आहे. सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाही उत्सवात सहभागी होऊन एक नवा रेकॉर्ड करावा. आणि हो मास्क वापरा तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जवळपास १२ प्रचारसभांना संबोधित केले. लोकांनी आपल्या मनात एनडीएला सत्तेत आणण्याचे पक्क केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान नितीश कुमार सलग चौथ्यांदा आपल्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचे आवाहन करत असून ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत आहेत. अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार एकत्र उपस्थित होते. तर नितीश कुमार यांना आव्हान देणारे तेजस्वी यादव यांनी १५ हून अधिक प्रचारसभांना संबोधित केले असून त्यांच्या सभेसाठी होणारी गर्दी नितीश कुमार आणि भाजपासाठी चिंतेची बाब आहे. तिसऱ्या टप्प्यात जवळपास दोन कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 दुसऱ्या टप्प्यात ५३ टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास ५३.५१ टक्के इतके मतदान झाले. ९४ मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानप्रक्रियेत मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, तेजस्वी यादव, लोजप प्रमुख चिराग पासवान या दिग्गज नेत्यांनी मतदान केले. तर तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यासह १४५० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.


हक्कभंग प्रकरणात अर्णब गोस्वामीची अटक टळली; सुप्रीम कोर्टाने विधानसभा सचिवांना फटकारले