सायकलवरून ११ देशांचा प्रवास करायला निघाला, लॉकडाऊनमध्ये अडकला आणि…

सायकलवरून ११ देशांचा प्रवास करायला निघाला, लॉकडाऊनमध्ये अडकला आणि…

सायकलवरून ११ देशांचा प्रवास करायला निघाला, लॉकडाऊनमध्ये अडकला आणि...

लॉकडाऊन दरम्यान सायकलवरून हंगरीहून भारतात आलेल्या हंगेरियन पर्यटकाला बिहारच्या छपरा येथे क्वारंटाइन करण्यात आले. ५५ दिवस रुग्णालयात असूनही त्याला ज्यावेळी डिस्चार्ज देण्यात आला नाही त्यावेळी त्या पर्यटकाने तेथून पळ काढला, परंतु बिहार पोलिसांनी त्याला पुन्हा पकडून रुग्णालयात दाखल केले.

हंगेरीहून २९ मार्च रोजी ११ देशांच्या दौर्‍यावर खास सायकलवर निघालेल्या हंगेरियन पर्यटक व्हिक्टर झिकोला लॉकडाऊन १ दरम्यान रिव्हलगंज येथे अडवून त्याला रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविले, तेथे त्याचे नमुने तपासल्यानंतर सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतरही त्याला १४ दिवस छपरामधील रुग्णालयाच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले.

लॉकडाऊन १ नंतर, देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवत तो लॉकडाऊन ४ वर पोहोचला आहे. कोलकाता मार्गे प्रशासनाकडून दार्जिलिंगला जाण्याची परवानगी मिळेल, अशी व्हिक्टरने आशा व्यक्त केली पण त्याला त्याचा प्रवास सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही.

दरम्यान, १० एप्रिल रोजी व्हिक्टरच्या खोलीतून सकाळी त्याचा लॅपटॉप, ४ हजार रुपये कपडे, आणि इतर सामान गहाळ झाले. या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्यांना चोरलेल्या सर्व वस्तूंसह ३ दिवसांत अटक केली. सर्व वस्तू मिळाल्यात पण चोरट्याने व्हिक्टरचा पासपोर्टसह त्याचे कपडे आणि २ हजारच्या नोटाही जाळून टाकल्यात. व्हिक्टरने अर्ज केल्यानंतर त्याचा पासपोर्ट तयार झाला, परंतु लॉकडाऊनमुळे कूरियर सेवा बंद असल्याने पासपोर्ट त्याला मिळाला नाही.

व्हिक्टरला रुग्णालयात ५५ दिवस राहून कंटाळा आला असून त्यांनी दार्जिलिंगच्या प्रवासाला जाण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची परवानगी मागितली पण सर्व ठिकाणाहून त्याच्या पदरी निराशा पडली. निराश झाल्याने तो २४ मे रोजी सकाळी ३ वाजता पुढील प्रवासास सर्व सामान सायकलवरुन घेऊन निघाला, मात्र पोलिसांना व्हिक्टर रूग्णालयातून पलायन झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्याला दरभंगच्या पोलिसांनी पकडले आणि पुन्हा त्याला छपरा सदर रुग्णालयात क्वारंटाइन राहण्यास सांगितले.

दरम्यान, बिहारचे मुख्य विरोधी पक्षनेते राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हिक्टरशी संवाद साधला. त्यांनी व्हिक्टरला आश्वासन दिले की आम्ही मदत करू.


Video: जीव वाचवण्यासाठी म्हशीने मारली सिंहांच्या अंगावरून उडी!
First Published on: May 29, 2020 11:49 AM
Exit mobile version