नादच खुळा; पोलीस दलात नोकरी मिळताच केला अनोखा विवाह

नादच खुळा; पोलीस दलात नोकरी मिळताच केला अनोखा विवाह

नादच खुळा; पोलीस दलात नोकरी मिळताच केला अनोखा विवाह

प्रेमात चंद्र-तारे तोडण्याची तसेच प्रेमात पडलेल्यांनी अनेक आश्वासने दिल्याचे तुमच्या ऐकण्यात आणि वाचण्यात आले असले. परंतु काही प्रेमी असेही आहेत जे प्रेमात उधळपट्टी किंवा अतिशयोक्ती करणारे आश्वासने देत नाहीत. ते प्रियकर किंवा मैत्रिणी आपल्यातील कौशल्य, क्षमता आणि आत्मविश्वासाच्या आधारे वचने देतात आणि ते पुर्णही करतात. असाच एक प्रकार प्रेमी युगलाने केल्याचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. प्रियकराने दिलेले आश्वसने पुर्ण केल्यावर आपल्या प्रेयसीसोबत त्याने मंदिरात विवाह केला आहे. बिहार पोलीस दलात सामील झाल्यावर या तरुणाने आपल्या प्रेयसीला दिलेले वचन पुर्ण केले आहे. हा तरुण पोलीस दलात सामील झाला असून प्रशिक्षणार्थी आहे. त्याने आपल्या मैत्रिणीसोबत आंतरजातीय विवाह करत आपले वचन पाळले आहे.

काय आहे प्रकरण

बेगूसराय जिल्ह्यातील मंसूरचक पोलिस ठाणे भागातील अहियापूर गावात राहणारा मुरली मनोहर आझाद आता नालंदामध्ये पोलीस होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. मगील काहि वर्षांपासून तो समस्तीपूर जिल्ह्यातील विद्यापती नगर येथील प्रतिभा कुमारी या मुलीवर प्रेम करतो. या दोघांची प्रेमकथा एक-दोन वर्ष जूनी नसून १० वर्षांची आहे. बर्‍याच काळापासून दोघे एकत्र जगण्याची व मरण्याच्या शपथा आणि आश्वासने देत आहेत. यामध्येच मुरलीने प्रतिभाला वचन दिले की जेव्हा पोलीस दलात भर्ती होईल, तेव्हा तो तिच्याशी विवाह करेल. आता मुरलीने सब-इंस्पेक्टर पदाचे प्रशिक्षण सुरू केले आहे, त्यामुळे आपले त्याने बिहारशरीफच्या बाबा मनिराम अखाडा मंदिरात प्रतिभाशी लग्न करून दिलेले वचन पूर्ण केले आहे.

मुरली आणि प्रतीक्षाचा हा प्रेम विवाह आंतरजातीय आहे. परंतु हे प्रेम प्रकरण जेव्हा लग्नाच्या बंधनात अडकले तेव्हा या विवाह सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते. बिहारशरीफमधील बाबा मनिराम अखाडा मंदिराचे संरक्षक अमरकांत भारती यांचे दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर प्रशिक्षणार्थी सब इंस्पेक्टर मुरली मनोहर आझाद आणि प्रतिभा कुमारी दोघेही आनंदी दिसत होते. आपल्या मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी दोघांच्याही कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

First Published on: January 20, 2021 5:01 PM
Exit mobile version