निधनानंतर सर्वसामान्य ते राजकीय नेत्यांकडून शरद यादव यांना श्रद्धांजली

निधनानंतर सर्वसामान्य ते राजकीय नेत्यांकडून शरद यादव यांना श्रद्धांजली

जेडीयूचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. उपचारादरम्यान शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी शरद यादव यांना श्रद्धांजली अर्पण केली. शरद यादव यांनी शेतकरी, कामगारांच्या मुद्यांवर भरीव काम केले आहे. (Tribute to Sharad Yadav from common people to political leaders after his death)

शरद यादव हे मुळचे मध्य प्रदेश मधील होते. 1974 मध्ये त्यांनी संसदीय राजकारणाला सुरुवात केली होती. शरद यादव यांच्या निधनावर देशभरातील सर्वच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अनेक बड्या नेत्यांनी शरद यादव यांच्या राजकीय प्रवासाचे वर्णन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

विशेष म्हणजे शरद यादव यांच्या राज्यसभेतल्या भाषणांची खूप चर्चा व्हायची. गेल्या काही दिवसांपासून विजनवासात, शेवटी शेवटी जे डी यु ने बडतर्फही केलं होतं. त्यांची मुलगी सध्या काँग्रेसमध्ये आहे.


हेही वाचा – विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी ‘या’ दोन दिवशी जाणार संपावर

First Published on: January 13, 2023 8:29 AM
Exit mobile version