मोदी-योगींवर आक्षेपार्ह टीका; काँग्रेसच्या अलका लांबाविरोधात FIR

मोदी-योगींवर आक्षेपार्ह टीका; काँग्रेसच्या अलका लांबाविरोधात FIR

पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्याबद्दल काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या विरोधात हजरतगंज पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्य प्रिती वर्मा यांनी अलका लांबा विरोधात केस दाखल केली आहे.

प्रिती वर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अलका लांबा यांनी २५ मे रोजी रात्री १२ वाजून ७ मिनीटांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अतिशय आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. तक्रारीत म्हटले आहे की अलका यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांच्यासाठी अपमानास्पद शब्द वापरण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये हायकोर्टाच्या न्यायाधीशांवर दिशाभूल करणारे आरोप केले होते.

अलका लांबा यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम ५०४, कलम ५०५ (१) (बी), ५०५ (२) आणि माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) अधिनियम २००८ की कलम ६७  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्नावच्या माखी बलात्कार प्रकरणाची मुलगी आणि भाजपचे माजी आमदार कुलदीपसिंग सेंगर यांची मुलगी ऐश्वर्यानेही उन्नाव पोलिसात उन्का लांबाविरोधात तक्रार दाखल केली होती. ऐश्वर्याने देखील कॉंग्रेस नेते अलका लांबावर दिशाभूल करणारे ट्विट करण्याबाबत आरोप केले होते.


हे ही वाचा – रद्द झालेल्या गाड्यांचे पैसे आजपासून ‘या’ स्थानकावरील तिकीट खिडकीवर मिळणार परत!


 

First Published on: May 26, 2020 9:11 AM
Exit mobile version