ब्लू टिकसाठी ‘या’ दिवसापासून मोठी रक्कम वसूल केली जाणार; एलॉन मस्कची माहिती

ब्लू टिकसाठी ‘या’ दिवसापासून मोठी रक्कम वसूल केली जाणार; एलॉन मस्कची माहिती

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यामधील सर्वाधिक मोठा म्हणजे ‘Blue Tick’ सबस्क्रिप्शन. कारण आता ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यानुसार दर महिना 8 डॉलर म्हणजचे जवळपास 660 रुपये वसूल केले जाणार आहेत. मात्र ही सेवा नेमकी सुरू कधी होणार असा सवाल एका युझरने विचारला त्यावर एलॉन मस्कने उत्तर दिले आहे. (twitter blue tick subscription charge timeline revealed by elon musk)

एका ट्विटरच्या युजरने ‘Blue Tick’ सबस्क्रिप्शन सुविधा कधी सुरू होणार असे ट्विटरच्या माध्यमातून विचारले. त्याला टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी पुढील आठवड्याच्या अखेरीस ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे सांगितले.

‘Blue Tick’ सबस्क्रिप्शनसाठी एका iOS युझरने ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेसाठी अर्ज केला. त्यावेळी त्याला सशुल्क सेवा सुरू केल्याबद्दल धन्यवाद आणि हे वैशिष्ट्य लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध होईल, असा संदेश दिसत आहे.

एलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, ट्विटर प्लॅटफॉर्मला फ्री चालवले जाणार नाही. ट्विटर ‘Blue Tick’साठी दर महिना 8 डॉलर म्हणजचे जवळपास 660 रुपये वसूल केले जाणार आहेत. तसेच, ट्विटर ‘Blue Tick’ देण्याची सध्याची सिस्टम व्यवस्थित नाही, असेही त्यांनी म्हटले.

“पेड ब्लू टिक यूजर्सला रिप्लाय, सर्च आणि मेंशन मध्ये प्राथमिकता दिली जाईल. याशिवाय, ट्विटरवर मोठे व्हिडिओ आणि ऑडियो पोस्ट केले जावू शकतील. ट्विटर ‘Blue Tick’ यूजर्सला आधीच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील”, असेही एलॉन मस्क यांनी सांगितले. दरम्यान, भारतात ही सेवा वापरण्यासाठी 8 डॉलरपेक्षा कमी किंमत मोजावी लागणार असल्याचे समजते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – ‘दहशतवादी, खुनी म्हणून न बघता आमच्याकडे पीडित म्हणून पाहा’; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची विनंती

First Published on: November 13, 2022 2:51 PM
Exit mobile version