Twitter कडून Edit Button रोलआउट; युजर्सला मोजावे लागणार इतके पैसे

Twitter कडून Edit Button रोलआउट; युजर्सला मोजावे लागणार इतके पैसे

ट्विटरने एडिट बटण रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. या बटणाच्या मदतीने युजर्सला आपले ट्विट एडिट करता येणार आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलँडमध्ये हे फिचर लाँच केल्यानंतर ट्विटर हळूहळू अमेरिकेत आपल्या पेड सब्सक्रायबर्ससाठी एडिट बटन उपलब्ध करुन देत आहे. ट्विटरने अधिकृत ट्विट्द्वारे घोषणा केली की, अमेरिकेत ट्विटर एडिट ट्विट फिचरच्या टेस्टचा विस्तार करत आहे, जे सध्या ट्विटर ब्लू मेंबर्सपुरते मर्यादित आहे.

Twitter युजर्स वर्षानुवर्षे आपले ट्विट पब्लिश केल्यानंतर एडिट फिचर मागणी करत होते. टायपिंगमध्ये झालेल्या जास्तीत जास्त चुका ठीक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटर आणि त्याच्या निरीक्षकांनी ट्विट्सला एडिट करण्याची परवानगी दिल्याने चुकीची माहिती पसरवण्यासारखे हानिकारक परिणाम होऊ शकतात की नाही यावर चर्चा केली आहे.

ट्विटरने सप्टेंबरमध्ये म्हटले होते की, ज्या युजर्सनी ट्विटर ब्लूसाठी दरमहा $4.99 (सुमारे 410 रुपये) पे करावे लागतील. ग्राहक ट्विट पब्लिश केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत आपले ट्विट एडिट करू शकतील. सध्या त्यांच्याकडे असे एक फिचर आहे. जे ट्विटला एका मिनिटापर्यंत होल्डवर ठेवता येते, ज्यामुळे युजर्सना ट्विटचा रिव्ह्यू करता येते तसेच पोस्ट पब्लिश होण्याआधी UNDO करता येते.

एडिट ट्विट्स फिचरमध्ये एक आयकॉन आणि टाईमस्टॅम्प सुद्धा आहे. ज्यात पोस्ट शेवटचे एडिट केव्हा केले हे दिसते. यूजर एडिट डिस्ट्री आणि पोस्टच्या आधीच्या व्हर्जनला पाहण्यासाठी एडिट ट्विटच्या लेबलवर क्लिक करु शकतील. या आठवड्याच्या सुरुवातीत ट्विटरने यूजर्सला ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझिलँडमझ्ये आपली ब्लू सर्विसची सदस्यता घेणाऱ्यांसाठी ट्विट एडिट करण्यासाठीची सुविधा सुरु केली आहे. मोस्ट अवेटेड एडिटिंग टूल टेस्ट चांगल्या पद्धतीने सुरु आहे.


धनुष्यबाण कुणाचा?, ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंतची मुदत; आयोगाकडून उद्धव ठाकरेंना पत्र


First Published on: October 7, 2022 7:50 PM
Exit mobile version