घरताज्या घडामोडीधनुष्यबाण कुणाचा?, ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंतची मुदत; आयोगाकडून उद्धव ठाकरेंना...

धनुष्यबाण कुणाचा?, ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंतची मुदत; आयोगाकडून उद्धव ठाकरेंना पत्र

Subscribe

शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर आता दोन्ही गटांत धनुष्यबाण कुणाचा? यावरून वाद सुरू आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई सुरू आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. त्याला आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. 27 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा आयोगाकडेच आले आहे. परंतु आता निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंत मुदत दिली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उत्तर सादर करावे लागणार आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले. या पत्रातून मुदतवाढीची माहिती दिली आहे. शिंदे गटाचे वकील चिराग शाह यांच्या याचिकेचा तपशील 4 तारखेलाच ठाकरे गटाला पाठवल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. आज शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. तर ठाकरे गटाला उद्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या ठाकरे गटाकडून किती आणि कसे पुरावे सादर केले जाणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिंदे गटाच्या वतीने 40 आमदार आणि 12 खासदारांसह लाखो प्राथमिक सदस्यांचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाची मागणी करण्याबरोबरच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होण्याची तक्रारही शिंदे गटाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यामुळे येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक चिन्हाबाबतचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा : ‘धनुष्यबाण’ कोणाकडे? निवडणूक आयोगाकडून 14 ऑक्टोबरपर्यंत निर्णय अपेक्षित


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -