ट्विटरने ऑफिशिअल लेबल काढून टाकले; म्हणे, येत्या काळात अनेक बदल होतील

ट्विटरने ऑफिशिअल लेबल काढून टाकले; म्हणे, येत्या काळात अनेक बदल होतील

नवी दिल्ली – ट्विटरने निवडक ऑफिशिअल खात्यांसाठी “अधिकृत” लेबल (Official Label) सादर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हे अधिकृत लेबल देण्यात आले. मात्र, काही तासानंतर दिलेले अधिकृत लेबल काढून टाकण्यात आले आहे. अमेरिकन YouTuber मार्क्स ब्राउनलीने लेबल गायब झाल्याची माहिती ट्विट केली.

ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क म्हणाले की, येत्या महिन्याभरात ट्विटरमध्ये अनेक बदल होतील. जे बदल काम करतील ते ठेवले जातील नाहीतर ते काढून टाकण्यात येतील. ट्विटरच्या खात्यांवर सध्या ‘अधिकृत’ असं लेबल लावण्यात येणार नाहीय. मात्र, ट्विटवर असलेल्या फेक अकाऊंटसवर आमचं लक्ष असेल असंही ट्विटरकडून सांगण्यात येतंय.


ट्विटरने बुधवारी सकाळी जाहीर केले की ते प्रमुख मीडिया आउटलेट्स आणि सरकारांसह निवडक महत्त्वाच्या खात्यांसाठी ‘अधिकृत’ लेबल देण्यात येणार आहे. Twitter चे आधीचे अधिकारी एस्थर क्रॉफर्ड यांनी ट्विट केले की पूर्वी पडताळलेल्या सर्व खात्यांना “अधिकृत” लेबल मिळणार नाही. यापुढे सरकारी अधिकारी, व्यावसायिक कंपन्या, व्यवसायिक भागीदार, प्रमुख मीडिया आउटलेट्स, प्रकाशक आणि काही सार्वजनिक व्यक्तींनाच अधिकृत लेबल मिळणार आहे.


ट्विटरचे नवे सीईओ एलोन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर ब्लू टीकसाठी आठ डॉलर प्रति महिने लागू करण्यात आले. भारतासह विविध देशात ही रक्कम कमी अधिक असू शकते.

हेही वाचा फेसबुकच्या मूळ कंपनीत मोठी कर्मचारी कपात; कमाईतील तूट भरून काढण्यासाठी निर्णय

First Published on: November 10, 2022 6:37 PM
Exit mobile version