Corona: ट्विटरच्या सीईओनं केली १ बिलियन डॉलरची मदत!

Corona: ट्विटरच्या सीईओनं केली १ बिलियन डॉलरची मदत!

ट्वीटरच्या सीईओनं केली १ बिलियन डॉलरची मदत!

ट्विटरचे संस्थापक आणि सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) जॅक डोर्सी यांनी कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ही आर्थिक मदत म्हणजे १ बिलियन डॉलर सुमारे ७६.१३ अब्ज रुपये निधी आहे. जॅक डोर्सी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ट्विट करत सांगितले की, ते आपल्या संपत्तीपैकी २८ टक्के म्हणजेच सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपये आर्थिक मदत स्वरूपात देणार आहेत. ही आर्थिक मदत त्यांनी स्टार्ट स्मॉल फाउंडेशनकडे सुपूर्द केली आहे. तसेच Squaire मध्ये गुंतवणूक केलेल्या १ बिलियन डॉलरची संपत्ती चॅरिटेबल फंडामध्ये दान करणार असून ही आर्थिक मदत Start Small LLC ला Global Covid-19 Relief म्हणून करण्यात येणार आहे.

गार्डियन अहवालानुसार, जगातील कोरोनाशी लढण्यासाठी एखाद्या व्यक्तीने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बद्दल सांगायचे झाले तर जेफ बेजोस हे सर्वात श्रीमंत असून त्यांनी १०० मिलियन डॉलर अमेरिकन फूड बँकमध्ये दान केले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार ट्विटरचे संस्थापक आणि सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) जॅक डोर्सी यांची संपत्ती ३.९ बिलियन डॉलर आहे. मात्र कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी हे पैसे कोठे पाठविले जातील हे अद्याप जॅक डोर्सी यांनी स्पष्ट केले नाही.


अखेर डोनाल्ड ट्रम्प आले ताळ्यावर; म्हणाले, ‘भारताचं बरोबर’!
First Published on: April 9, 2020 12:03 AM
Exit mobile version