Viral Photo: त्याने कुत्र्याचं पिल्लू समजून आणलं घरी, पण…

Viral Photo: त्याने कुत्र्याचं पिल्लू समजून आणलं घरी, पण…

Viral Photo: त्याने कुत्र्याचं पिल्लू समजून आणलं घरी, पण...

अनेकांच्या घरात कुत्रा, माजराचे पिल्लू असे प्राणी पाळलेले दिसतात. परदेशात देखील अनेकांना वेगवेगळे प्राणी पाळण्याची आवड असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. सध्या एका तरुणाच्या घरी असलेल्या प्राण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरूणाने कुत्र्याचं पिल्लू समजून त्याच्या घरी तो ते पिल्लू घेऊन आला मात्र ते पिल्लू कुत्र्याचं नसून कोल्ह्याचं पिल्लू असल्याचे समोर आले आहे.

ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमुळे जपानमधील एक व्यक्ती सध्या चर्चेत आहे. या व्यक्तीने अलीकडेच आपल्या ट्विटर हँडलवरून एका छोट्या प्राण्याचा काही फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, मला हा पिल्लू रस्त्यावर बसलेला दिसला, मी त्याला माझ्या घरी आणले आहे.” तसेच मी त्याचे नाव ‘लुना’ ठेवले आहे. परंतु मला हे पिल्लू त्याच्या मालकाकडे पोहोचवायचे आहे, म्हणून मी त्याचे काही फोटो तुमच्याबरोबर शेअर केले आहे.

ही घटना जपानच्या त्सुकिगाटा शहरात घडली आहे. एका युझर्सने या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. हे कुत्र्याचं नाही तर कोल्ह्याचे पिल्लू आहे असेही युझर्सचे म्हणणे आहे. तर एका युझरने चक्क रॅकूनचे पिल्लू असल्याचा दावा केला असून हा प्राणी कुत्र्यासारखा भुंकत नाही तर वेगवेगळे आवाज काढतो आहे. त्यामुळे हा कुत्रा नाही असेही एका युझरने या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

Yahoo Newsने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला अशा प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तो या कोल्ह्याच्या पिल्लूला घेऊन प्राण्यांच्या डॉक्टरकडे गेला. तिथे त्याला कळले की हे कुत्र्याचं पिल्लू नसून कोल्ह्याचं पिल्लू आहे. त्यानंतर या तरुणाने हे पिल्लू फॉक्स सेंच्यूरी संस्थेकडे सोपवले असल्याचे सांगण्यात येत आहे.


ज्या मुलावर ३ वर्षापुर्वी केले अंत्यसंस्कार, लॉकडाऊनमध्ये आला अचानक घरी! आणि…
First Published on: May 15, 2020 6:08 PM
Exit mobile version