यूपीतील यमुना एक्सप्रेस वेवर दोन कारचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

यूपीतील यमुना एक्सप्रेस वेवर दोन कारचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेश मधील यमुना एक्सप्रेस वेवर शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मथुरा जिल्ह्यातील सुरीर पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. (Two car accident on Yamuna Expressway in UP, 4 died on the spot)

शुक्रवारी रात्री यमुना एक्सप्रेसवेच्या माईलस्टोन 87 येथे दोन कारची धडक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीने उपचारांसाठी मथुरा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेसंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

याआधीही 12 मे 2022 रोजी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा अंतर्गत यमुना एक्सप्रेसवेवर अपघात झाला होता. ह्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील लोक आग्राहून नोएडाला जात होते. जेवर टोल प्लाझासमोर 40 किमीच्या एका दगडाजवळ हा अपघात झाला.

त्याचसोबत 7 मे 2022 रोजी यमुना एक्स्प्रेस वेवर नौझील परिसरात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. माईलस्टोन 68 जवळ हा अपघात झाला. यमुना द्रुतगती मार्गावर वॅगनआर कारचा अपघात झाला होता. गाडीचा स्फोट झल्याने या अपघातात तीन पुरुष, तीन महिला आणि लहान मुलं जागीच ठार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या अपघातात एक व्यक्ती आणि एक मुल गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील माणसे हरदोईहून दिल्लीच्या दिशेने एका लग्न समारंभासाठी जात होते.


हे ही वाचा – बड्या नेत्यांवरील हल्ल्यांचा पाकिस्तानचा रक्तरंजित इतिहास, त्यामागे नेमके कोण?

First Published on: November 5, 2022 9:36 AM
Exit mobile version