कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीचे दोन डोस ९५ टक्के प्रभावी – ICMR

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीचे दोन डोस ९५ टक्के प्रभावी – ICMR

Corona vaccine :

देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र अद्याप लोकांच्या मनात लसीविषयी शंका आहे. कोरोना विरोधी लढण्यासाठी कोरोना लस किती प्रभावी आहे यावर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. कोरोनाच्या काळात फ्रंटलाइन वर्कर्सच्या होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी कोरोना लसी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR)  एका अभ्यासात कोरोना विरोधी लस फ्रंटलाइन वर्कर्सच्या होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी आहेत. तमिळनाडूच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेल्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे की, कोरोना लसीचे दोन डोस ९५ टक्के प्रभावी आहेत. यासंबंधिची माहितीICMR ने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Two doses of vaccine are 95% effective in preventing corona Death – ICMR)


ICMR च्या अभ्यासानुसार, कोरोना लस राज्यातील ८२ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रभावी ठरली. ज्यांनी लसीचे एक किंवा दोन डोस घेतले होते त्यांना ९५ टक्के लस प्रभावी ठरली. राज्य पोलीस विभाग आयसीएमआर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अन्ड क्रिश्चियन मेडिकल कॉलेज वेल्लोर द्वारे केलेला हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झाला.

तमिळनाडूमध्ये १ लाख १७ हजार ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ३२ हजार ७९२ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा एक डोस देण्यात आला. तर ६७ हजार ६७३ कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. या वर्षी राज्यात १३ एप्रिल ते १४ मे दरम्यान ३१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यातील ४ जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर सात जणांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला होता आणि इतर २० जणांचे लसीकरणच झाले नव्हते.


हेही वाचा – Post Covid Symptoms: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या पित्ताशयाला सूज, डॉक्टरही हैराण

First Published on: July 7, 2021 11:58 AM
Exit mobile version