प्रवाशांची संख्या कमी झाल्याने राजधानी एक्सप्रेसचे दोन डब्बे केले कमी, रेल्वेचा निर्णय

प्रवाशांची संख्या कमी झाल्याने राजधानी एक्सप्रेसचे दोन डब्बे केले कमी, रेल्वेचा निर्णय

राजधानी एक्सप्रेस

प्रवाशांची संख्या कमी झाल्याने भारतीय रेल्वेने राजधानी एक्सप्रेसचे दोन कोच (डब्बे) तात्पुरते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्या उत्तर रेल्वे विभागांतर्गत चालवल्या जातात. उत्तर रेल्वेने यासंदर्भात एक परिपत्रक देखील जारी केली आहे. यामध्ये राजधानी एक्स्प्रेसच्या या दोन्ही गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले जात आहे.

उत्तर रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन- Dr MGR चेन्नई सेंट्रल-निजामुद्दीन राजधानी स्पेशल (ट्रेन क्रमांक-०२४३४/०२४३३) या गाडीचा एक टू टायर AC कोच कमी करण्यात येणार आहे. तसेच १४ एप्रिल २०२१ पासून निजामुद्दीन ते चेन्नईकडे जाणाऱ्या गाडीचा एक टू टायर AC कोच कमी करण्यात आला आहे. त्याचबरोबर, १६ एप्रिल २०२१ पासून चेन्नई ते निजामुद्दीनकडे येणाऱ्या या गाडीला हा कोच बसविला जाणार नसल्याचेही सांगितले जात आहे. त्याचबरोबर निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल-निजामुद्दीन राजधानी स्पेशल (ट्रेन क्रमांक ०२४३२/०२४३१) या गाडीचा देखील एक टू टायर AC कोच हटविण्यात आला आहेत. ११ एप्रिल २०२१ पासून निजामुद्दीनहून तिरुअनंतपुरम येथे जाणाऱ्या गाडीचा एक टू टायर AC कोच कमी करण्यात आला आहे. यासह १३ एप्रिल २०२१ पासून तिरुवनंतपुरम सेंट्रल वरून निजामुद्दीनकडे येणाऱ्या गाडीचा एक टू टायर AC कोच काढण्यात आला आहे.

दुरांतो एक्सप्रेसच्या कोचमध्ये होणार वाढ

उत्तर रेल्वेने एर्नाकुलम-निजामुद्दीन दुरांतो सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीला अधिक कोच जोडण्याता निर्णय घेतला आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन-एर्नाकुलम-निजामुद्दीन दुरांतो सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल गाडीला AC ३ टायरचा १ कोच आणि दोन स्लीपर क्लास डबे अधिक जोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. निजामुद्दीनहून धावणारी ही गाडी १७ एप्रिल २०२१ ते १६ ऑक्टोबर २०२१ आणि एर्नाकुलम ते निजामुद्दीनकडे येणाऱ्या या गाडीला २० एप्रिल २०२१ ते १९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत हे जादा कोच बसविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, दक्षिण रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी कोरोनाचे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये रेल्वे आणि रेल्वे स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे, स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच, अनावश्यक प्रवास टाळण्यास देखील सांगितले आहे.


Corona Vaccine : देशात कोरोना लसीची चोरी; राजस्थानमध्ये उडाली खळबळ

First Published on: April 15, 2021 8:27 AM
Exit mobile version